वेळ असतेच अशी, स्वतःमध्ये गुंतलेली…
वेळ लगेच पलटते, पुढल्या क्षणालाच! तिला वेगळा मार्ग नसतो इथे तिथे जायला. तिला फक्त एकच गोष्ट माहित असते की होत असलेल्या क्षणात किती लवकर मिसळता येईल. त्यानुसार तीचं वागणं असतं. मर्यादा नावाची गोष्ट नसते तिच्या जवळ. असेल तरी काय? ती वेळ आहे, तिला फक्त जाता येतं. तिचा पाय भक्कम कधीच नसतो. किमान त्याची ती कधी शाश्वती तरी देत नाही.
याच्या मागे तिचा तरी काय दोष नाही का! वेळेनुसार गोष्टी बदलतात पण वेळ त्या गोष्टी बदलून आणत नाही. आपण आपल्यासाठी त्या गोष्टी बदलून आणतो. आपल्या स्वार्थासाठी म्हणा किंवा मग एखाद्यासाठी. आपण कधीही विनाकारण काहीच करत नाही. प्रत्येक गोष्टीमागचं कारण आपल्याला माहीत असतं. त्याच्या वरच निर्भर राहून जाण अजाणपणे आपण सगळं करत असतो. त्यामुळे आपण कोणताही आरोप वेळेवर करूच कसा शकतो?
परिस्थिती ही वेळेनुसार बदलते असं म्हणतात. पण ती परिस्थती आणि ती वेळ आपल्याला सांगून येत नाही कधी. किंवा ती आपल्याच मुळे आपल्यावर ओढावली गेली आहे ह्याचा अंदाज आपल्याला नाहीच येत कधी. तेच कारण होऊन जातं आपल्या आयुष्यातल्या गोष्टी घडायला. काही जण लाख म्हणतील हे विधी लिखित आहे आणि हे असंच होणार त्यात आपण काही बदल करू शकत नाही. पण काही जण असेही म्हणतात कि आपण ते बदलू शकतो आपल्या कर्तृत्वातून! वेळेशी सहमत राहता आलं तर हवं ते मिळवता येतं.
पण नेहमी हवं ते मिळवता येत नाही कारण काही गोष्टी आपल्याला गरजेच्या नसतात. त्यामुळे त्या मिळत नाही. आपण जे मिळवू इच्छितो ते जर नसेल मिळत तर समजून जायचं की यापेक्षाही जास्त चांगल्या गोष्टीचे हकदार तुम्ही आहात. त्यामुळे निराशा असली तरी ती क्षणिकच असणार यात काही वाद नाही. काही जण सतत कष्टात आणि दुःखात असतात पण तेच काही जण काही वेळांनंतर एखाद्या सुखद अनुभवात गुंतलेले असतात. जे त्याना काही क्षण का असेना पण सुख देऊन जातात.
NICE SUBJECT .LAST TWO LINES ARE ALWAYS TRUE & TOO BEAUTIFUL.
It is our pleasure you liked it. keep reading have a nice time ahead.