काही गोष्टी गुलदस्त्यात च हव्यात…

त्या गुलदस्त्यात कोणाचीच ये जा नसावी!

काही गोष्टी गुलदस्त्यात च हव्यात...
काही गोष्टी गुलदस्त्यात च हव्यात…

कधी कधी नाती गुलदस्त्यात उलगडून जातात. जुन्या नव्या गोष्टी जेव्हा एकमेकांवर आदळू लागतात. परिणाम काहीही होउदे नुकसान मात्र नक्की करून जातात किमान त्या क्षणापुरतं तरी. ते नुकसान पुढे जाऊन मनात खूप जास्त त्रागा निर्माण करून ठेवतं. जो त्रागा आपल्या शरीरासाठी अर्थात चांगला नाही आहे. पण काही नात्यात हा त्रागा किंवा मनात असलेल्या गोष्टी मनातच ठेवतात.

त्यामागे कारणं असणार नक्कीच असणार! पण त्याचा आदर करण्याऐवजी त्याची चेष्टा केली जाते. मग अपेक्षा का म्हणून असावी कि आम्हाला सगळं माहित असण्याचा हक्क आहे. कारण जो हक्क गाजवण्याचा प्रयत्न आहे ना तोच मुळात चुकीचा आहे. म्हणजे आधी आपण दुखवायचं आणि पुढच्या क्षणाला सॉरी बोलून गोष्टी पहिल्यासारख्या होतील याच्या अपेक्षा ठेवायच्या. का? आणि कशावरून तुम्ही ठरवणार कि हीच वेळ योग्य आहे माफी मागायची, वेळ गेल्यावर गोष्टींना अर्थच उरत नाही काही.

नुसत्या गैरसमजावर काहीही बांधून पुढे निघायचं कशाला? त्याचा फायदा काय नेमका? मी सांगतो ना काहीच नाही किंवा बरंच काही. काहीच नाही या साठी कि, तुम्ही तुमचं आवडतं नातं गमावत आहात. बरंच काही चा अर्थ असं असतो कि त्या नात्यापासून मोकळीक मिळावी म्हणून केलेली खटाटोप होती ही. आता दोघांमधलं खरं खोटं काय हे त्याच वयक्तिक व्यक्तीला माहित असणार. साहजिक आहे कोणत्या तरी गोष्टीचा किंवा वयक्तिक राग ठेवून नाती तोडली जातात कोणा दुसऱ्या नव्या निर्माण होणाऱ्या नात्यासाठी.

कोणालाही सगळ्या गोष्टी सांगून उपयोग नसतो, ते गरजेचं नसतंच मुळात कारण तेच आपल्या विरुद्ध उपयोग केलं जातं. त्यामुळे आपला वापर करणारे आपलेच आधी असतात. म्हणूनच गुलदस्ता असतो आपला आपल्यासाठी, आपल्या सरंक्षणासाठी. प्रेमापोटी बोलल्या गेलेल्या भावनिक संवादाला वळण देऊन चर्चेचा विषय करणं हे काही योग्य नाही. आणि त्याने कोणीतरी दुःखी होऊ शकतं ह्याचं भान असलं पाहिजे.

@UgtWorld

Related Posts