सण, वार आणि त्यांचा बाजार!

बाजार आणि त्यातल्या पोषक बनावट गोष्टी…

बाजार

आयुष्याच्या बाजार रहदारीत हल्ली काय सुरु असतं हे वेगळं कोणाला सांगायला नको. कारण सांगून पण फायदा काय होणार नाही असंच म्हणत सुटतात सगळे आणि ते खरं पण आहे. एका बाजूने लढत रहा, तुम्हाला वाट मिळेल असंच म्हटलं जातं. त्या वाटेवर आपला खानपानाचा पोशाख घालून असतात ते सगळ्यांना माहित असतं. कोणा एकाच्या हातात काहीच नसतं हे सर्वांना माहित असून ही सगळे फक्त तोंडाच्या वाफा सोडतात. ते तरी काय करणार म्हणा!

कसंय! आताच्या घडीला सर्वांना पुढे यायचं आहे पण ते वेगळ्या मार्गाने. म्हणजेच चेहरा दिसायला हवा पण काय आहे त्या दिसणाऱ्या चेहऱ्यामागे हे समजलं नाही पाहिजे कोणालाच. अहो हीच तर कला असते आजच्या काळात. बनावटी पोषक गोष्टी फक्त वस्तू म्हणून मिळतात कि काय बाजारात. तसं अजिबात नाहीए आजकाल पोषक आणि अत्यंत बनावटी माणसं सुद्धा उपलब्ध असतात बाजारात. ते ही त्यांच्या योग्य दरात अथवा त्यांच्या अपेक्षित किमतीत.

सण, वार आणि त्यांचा बाजार!

प्रत्येक सण-वार हा त्या त्या पोशाख घातलेल्या पोषक माणसांमध्ये वाटलेला असतो. त्या नुसार पुढच्या गोष्टी आखल्या जातात. हे काही वेगळं आणि नवं असं नाहीए म्हणा! पण त्यातल्या त्यात ह्या गोष्टी उघडकीस असून नजरकैदेत बंद आहेत. आपण फक्त तिरस्कार करून त्या बाजारात नजरफेर करत फिरू शकतो कारण नजर टाकली तरी त्या गोष्टी विकत घेण्यात कोणालाच रस नसतो. त्या आपल्या आवाक्याच्या बाहेर आहेत मुळात. त्यामुळे त्या विकत घेऊन आपण आपलेच खिसे जड केल्यासारखं जाणवेल.

जसं चित्रपट गृहात नवा सिनेमा लागतो, त्यात नव्या तारका आणि तारे असतात त्याचप्रमाणे इथल्या बाजारात देखील नवे नवे चित्रपट असतात नव्या विषयांसह. आपण मात्र विना खर्च बघतो असं आपल्याला वाटत असतं पण त्यात काडीमात्र तथ्य नाहीए. आपल्याच पदरचे पैसे भरून आपण हे सारं बघत असतो. अपर्यायी गोष्टींप्रमाणे हा सगळा आपल्या आयुष्याचा भाग झालाय. सण-वार साजरे करणारे बाजारातील पोषक उद्योजक नावलोकाला लवकरच येतील.

@UgtWorld

Related Posts