जसे आहात तसंच राहून स्वतःचा शोध घ्या…

सहजतेच्या आणि सोप्या गोष्टींपलीकडील स्वतःचा शोध!

शोध

जेव्हा तुम्ही कुठेतरी फिरतीवर असताना स्वतःला नव्या तऱ्हेने सापडता, आयुष्याच्या दृष्टिकोनातून ते योग्यच आहे. आयुष्य मुळातच आपल्यातल्या खऱ्या स्वतःचा शोध घेण्यासाठीच आहे. या मनुष्य जन्मात आपलं कार्य काय आहे हे शोधण्यासाठी आहे. ते सर्व आपल्या कंफर्ट झोनच्या पलीकडे आहेत, जिथे सगळ्या अलौकिक आणि आरामदायी गोष्टी नाहीश्या होतात.

सगळ्यात मोठं लक्ष एकच आहे! आपली मनःशांती आणि मनाला समाधानी ठेवणं. आपल्या आयुष्यातील प्रमुख ध्येयं काय आहे ते पाहणं आणि त्यासाठी जगणं. नात्यातील किंवा गोष्टींमधील अनावश्यक ओढ नैराश्याकडे नेते. त्यातून भावनिक धक्का बसतोच आणि मानसिक दबाव असतोच कि आपण हे करूया अथवा नको करूया.

सफर करतानाची प्रत्येक पायरी तुम्हाला एक थर तुमच्या आत नेते. अर्थात दुसऱ्यांच्या देखील जे तुमच्या सोबतीला किंवा सहवासात आहेत. जिथे तुम्ही एका अडथळ्यात सापडता जो अडथळा तुम्हाला हे नातं ठेवणं योग्य आहे कि नाही हा विचार करायला भाग पाडतो. हीच प्रश्न-उत्तरे कारणीभूत ठरतात आपल्याला विचारात पाडायला आणि आता मी ही हाच विचार करत आहे. हाच मानसिक दबाव मूळ बनतो आणि आपल्याला काळजीत टाकतो. सोबतच आपण नैराश्यच्या दिशेने चालू लागतो ते ही अगदी आयुष्याच्या सुरुवातीलाच!

आपलं चित्त शांत कसं ठेवायचं, आपल्या मनाला आराम कसा मिळेल यावर आपण सध्या जास्त लक्ष द्यायला हवं. कोणाच्या भावना किंवा कोणाच्या शब्दांमुळे आपल्याला जास्त फरक पडता कामा नये. प्रत्येक वेळेला कुणासाठी तरी तुमचं तिथे असणं गरजेचं नसतं. आपण सगळ्यांच्या अपेक्षा पुरवत बसायला देव नाही.

आपण मनुष्य प्राणी आहोत आणि आपण तितकंच करू शकतो जितकं आपल्या हातात आहे. त्यापलीकडे आपण काहीच करू शकत नाही. तर सगळ्यांना सावरत बसणं थांबवा. अखेरीस आपल्या परिवाराकडून सुद्धा संकेत येत असतात कि स्वतःला मोकळीक देण्याची आता वेळ आलेली आहे. आपलं आयुष्य आपल्यालाच घडवावं लागतं. स्वतःचा शोध घेण्यासाठीचा प्रत्येकाचा प्रवास हा असाच असतो आणि हे कोणीही बदलू शकत नाही.

@UgtWorld

Related Posts