आणि काही फरक सुद्धा दिसणार नाही!
खरं असो किंवा खोटं, काही माणसं जी कधीच बदलणार नाही. ते फक्त तुम्हाला दर्शवतील की आम्ही स्वतःला बदलून दाखवू पण अंततः पुन्हा त्याच जुन्या वाटेवर असतात. काहीही बदल दिसला नाहीए आणि काहीही बदल दिसणार सुद्धा नाही.
पण खोट्या वचनाच्या पद्धती इतक्या खऱ्या असतात आणि त्या क्षणाचं वागणं ही. जे आपल्याला मान्य करायला लावेल कि बदल झालाय आणि इथून पुढे तो कायम राहणार. पण नाही, हे असं काही होत नाही. इतक्यात तरी नाही कारण हा फक्त एक दिखावा असतो हो! दुसरं काही नाही. त्यांचं काम असे पर्यंत मधाने भरलेले शब्द असतात. एकदा का काम झालं कि उद्धट वागू लागतात. स्वार्थीपणा दुसरं काही नाही.
कोणीच कोणती गोष्ट फुकटात करत नाही, अर्थात आपले आई-वडील सुद्धा. आपल्या घरचे आपल्याकडून अपेक्षा ठेवतात, ते आपल्यासाठी करतात त्याचं कर्तव्य म्हणून. असं असलं तरी तुमचे आई-वडील, भाऊ, बहीण किंवा कोणीही, जर का तुमच्यासाठी काही करत असतील त्या बदल्यात त्यांना तुमच्या कडून काही तरी हवं असतंच.
ते काहीही असू शकतं म्हणजे काही गोष्टी तुमच्याकडून करून घ्यायच्या असतील. या आयुष्यात काहीच फुकट मिळत नाही कोणाकडून ही अगदी सृष्टी कडून सुद्धा. जर का तुम्हाला श्वास मिळत असेल निसर्गाकडून तर त्या बदल्यात तुम्ही तुमच्या आयुष्याच्या घटका मोजत आहात. म्हणजेच श्वासासोबत घालवलेला प्रत्येक क्षण!
आपला वेळ नीट खर्च करा कारण आयष्याचा क्षण वाया जात आहे. कोणतीच गोष्ट जास्त त्रासदायक नाही पश्चात्तापापेक्षा. पुढे जाऊन असं वाटायला नको कि हे मी करू शकत होतो पण केलं नाही वेळ असून सुद्धा. आपले क्षण व्यर्थ घालवू नका खास करून त्यांच्यासाठी जे त्याच्या लायकीचे नाहीत. पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही तुमच्या आयुष्याचे अनमोल क्षण स्वतः सोडून इतर कोणावर ही वाया घालवू नका.