त्याची शाश्वती तरी कोणत्या वाटा देतील?
हे आयुष्य आणि त्याच्यात असणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी. काही जण फक्त त्यांचं यश दाखवतात तर दुसरीकडे काही जण अपयश. आजच्या जगात फार कमी गोष्टी राहिल्यात खात्रीदायक आयुष्याच्या बाबतीत. संधी देखील कमी होत चालल्यात येणाऱ्या पिढीसाठी. सगळंच नाहीसं होत चाललंय नोकरीच्या जागा आणि शिक्षणाचा स्थर. भविष्याच्या सगळ्या वाटा खोट्या नाट्या.
खरं लपलंय तरी कुठे? खरं लपलंय ते खोट्या मध्ये, एका खोट्या दृष्टिकोनात. आपणचं इतकं सहन करतोय त्यात येणाऱ्या पिढीला खोटी आश्वासनं देतोय. खोट्या वाटा दाखवून त्यावर चालायला भाग पाडतोय. किती तरी डिग्र्या पडल्यात शिक्षणात घेण्यासारख्या पण एकाचाही मान नाही. त्या प्रमाणे नोकऱ्या नाहीत. त्या डिग्र्या फक्त टायपिंग च काम करण्यापुरता मर्यादीत ठेवल्या आहेत. जर ते ही काम नाही मिळालं तर आहेच फोन वर बडबड करण्याचं काम. काहीच रंजक राहिलं नाहीए. फक्त करायचं म्हणून सगळे करत आहेत.
आई वडिलांनी, समाजाने, आजूबाजूचे लोक यांनी आधीच काही लेबल लावून ठेवलेत. तुम्ही हेच केलं पाहिजे, तेच केलं पाहिजे तरच तुम्ही यशस्वी व्हाल. खरंतर कोणीच खऱ्या अर्थाने यशस्वी होत नाही जोवर तो स्वइच्छेने किंवा त्याच्या कामाबाबतीत समाधान आहे. करायचं म्हणून करणाऱ्या त्या गोष्टींमुळे ना तर धड शिक्षण घेता येत ना ही नीट काम करता येत. ह्यात त्यांची चूक आहे असं मी म्हणणार नाही आणि त्यांच्या आईवडिलांना ही दोष देऊन अर्थ नाही. कारण ते ही त्यांचा पिढीजात चालत आलेल्या नमुन्यावर जगत आहेत.
हा समाज आणि त्या समाजतली पद्धत हे मुख्य कारण आहे. मोजता येणार नाहीत इतकी माणसं त्यांच्या मनाजोगतं काम करू शकत नाहीत. त्यांना अपुऱ्या मिळणाऱ्या शिक्षण सुविधा, त्यांना न मिळणारं मार्गदर्शन. आता तर सगळं पैशात मोजलं जातं. काही सफेद कॉलर लोकांच्या किश्यात कमी पैसे जात आहेत ना त्याचा हा परिणाम आहे. पैसे कमी झाले तर समाजातील लोकांना आपल्या खिश्यात कसं भरता येईल.
प्रत्येक समस्येवर काही ना काही उपाय असतात पण त्यांची किंमत मात्र जास्त मोजावी लागते. हो! एखाद्याचं आयुष्य जाऊ शकतं यात. प्रत्येक वयोगटातील तरुण, मोठी माणसं सगळेच नैराश्याच्या आहारी गेलेत. एक उदासी लहान पणापासून मनात दडून बसलेली. ह्याला कुठेतरी शेवट हवाच. आपण लोकांशी तुलना करणं बंद केलं पाहिजे. लोकांना न जाणता त्यांच्याबाबतीत बोललं नाही पाहिजे कारण ती व्यक्तीच तिच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण कसं जगते ते सांगू शकते. बदल आपल्याकडून होईल अशीच आशा करू शकतो अपेक्षा नाही!