प्रेम जेव्हा गरज बनते, तेव्हा त्यात प्रेम उरत नाही!

वागणुकीमुळे जेव्हा सगळं काही खराब होत जातं…

प्रेम जेव्हा गरज बनते, तेव्हा त्यात प्रेम उरत नाही!

बरेच जण जेव्हा प्रेम करतात पण ते विसरतात की इतर बाबतीत कसं वागायचं. बोलताना भान राहत नाही. आधी सुद्धा होते ना प्रेमात पण मग आताच असं वागणं का? काही जण अगदी मूर्खांसारखे वागतात. इतके की बाकीची नाती तुटत चालली आहेत, त्यांना याचं पण भान राहत नाही. खास करून ती जी त्यांच्या फार जवळची आहेत, जिथे त्यांना मोकळीक मिळते.

नात्यात प्रेम असणं गरजेचं असतंच पण तेच जर करायचं म्हणून चाललं असेल तर त्याला अर्थ नाही. मुळातच तो पर्याय योग्य नाहीए. हे नंतर कळतं सगळं झाल्यावर. पण आयुष्य संधी देतं त्या लोकांना जे समजतात त्यांचं चांगलं. काही जण या लेबल पासून दूर राहतात. कारण त्यांना माहित असतं कोणी सांगतंय म्हणून केल्याने काही ही साध्य होत नाही.

प्रेम जेव्हा गरज बनते, तेव्हा त्यात प्रेम उरत नाही!

या अशा परिस्थितींमुळे आपण आपले चांगले आणि जवळचे मित्र-मैत्रिणी गमावून बसतो. दुसरीकडे स्वतःला देखील गमावून बसतो. कारण जिभेचा स्वतःवर ताबा राहत नाही. त्या प्रेमाला लेबल देऊ नका. आजकल च्या काळात प्रेम फक्त गरज म्हणून च बघतात. गरज जी त्यांच आयुष्य सुधारू शकेल. ते अखेरीस सुधारतं पण नकळत. प्रेमात जादू असतेच आणि हो होतात चमत्कार आयुष्यात त्यामुळे.

जबरदस्ती प्रेमाचा विचार करू नका. विचार बदलू शकतात पण भावना नाही. अंतर्मन काय सांगत त्या व्यक्ती बद्दल याकडे कल असुद्या. तो किंवा ती कसं आपल्यासोबत राहू शकतो. पूर्ण आयुष्य ना सही पण प्रेमाचा सफर जितका असेल तिथवर तरी. तुम्ही एखाद्यावर किती ही प्रेम करा जर ते स्वार्थाआड आलं कि सगळं विस्कटून जातं, दोघांसाठी देखील. स्वतःसोबत खरं वागा आणि त्या व्यक्ती बरोबर देखील ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता.

@UgtWorld

Related Posts