आयुष्यातल्या अनुभवांचे लघु-लेख

मराठी लघु-लेख. आयुष्य म्हटलं की अनुभव आलेच आणि भावना म्हटल्या की व्यक्त होणं येतच त्या सोबत. काही जण बोलून व्यक्त होतात काही जण रडून मोकळा श्वास घेतात. पण काही मात्र त्याला लिखाणाची कलाटणी देऊन शब्दात व्यक्त होतात. हे लघु-लेख त्याचंच एक उदाहरण आहे.

कित्येक घडामोडी आपण आयुष्यात पाहत असतो. काही अनुभवतो काही विसरतो तर काही विसरू पाहतो. आपल्या आयुष्यातले क्षण मात्र आपल्याला दूर जाऊ देत नाहीत. आपण ते दूर लोटले तरी. त्यात आठवणी असतात आपल्याला हव्या त्या आणि नको त्या सुद्धा. बऱ्याचदा आपण ह्यात यशस्वी होतो, आपल्या आठवणी योग्य त्याच ठिकाणी ठेवायला. आता योग्य म्हणजे नेमकं कसं, ते असं की चांगल्या वेळी चांगल्याच आठवणी आपल्या जवळ ठेवणं. जेणेकरून आपण उदास जरी असलो तरी देखील आपण चांगल्याच गोष्टी जवळ ठेवू शकू.

लघु-लेख अशी गोष्ट आहे ज्यात फार काही मांडाव लागत नाही. लघु-लेख लिहून अगदी मोजक्या शब्दात मनातलं सारं काही सांगता येत. ना शब्दांची सारवासारव ना गोष्टींचा दबाव की हे असच लिहिलं पाहिजे तसंच लिहिलं पाहिजे. लिखाण लिखाण असतं, ज्याच्या त्याच्या परीने जो तो लिहितो. फक्त ते अर्थहीन नसावं हीच एक मात्र त्यात अट असते.

अश्याच बऱ्याच गोष्टी आणि आयुष्यातले अनुभव या लघु-लेख वाचताना तुम्हाला अनुभवायला मिळतील. आणि ते नक्कीच आयुष्यातल्या पाऊलवाटेवर चालण्यास मदत करतील अशी आम्हाला आशा आहे. आपला वेळ देण्यासाठी धन्यवाद. आणि आम्हाला खात्री आहे हे लघु-लेख वाचताना तुमचा वेळ ही चांगला जाईल.

Related Posts