माणसं जी आपल्याला त्रास देतात!

काही वेडसर माणसं...

मला माहित आहे तुम्ही काय विचार करत असाल ह्या विषयावर. पण मी सरळ मुद्याचच बोलणार. मी त्या काही माणसांबद्दल बोलतोय, जे आपल्याला ओळखतात अगदी सुरुवातीपासून. नाही नाही! मी आपल्या आई किंवा वडील यांच्या बद्दल बोलत नाही आहे. मी त्यांच्या माणसांबद्दल बोलत आहे. हा! आता समजलं असेल म्हणा… काही वेडसर माणसं!

आपणच तर त्यांना हक्क देतो आपल्याबद्दल बोलण्याचा. मग ते आपल्या मागे बोलूदे किंवा मग आपल्या समोर असताना. तेव्हा मात्र त्यांना मर्यादा दिसत नाहीत. ते या विचारात येऊन बोलू लागतात, जस कि हेच आपलं घर चालवतात. त्यांचं ते वागणं, ते घमंड, ती बोलण्याची पद्धत… आणखी काय सांगावं मी या बद्दल. सगळेच वैतागले आहेत या गोष्टीला आणि या माणसांना घेऊन. मुख्यतः तरुण पिढी. 

तेच तर झेलत आलेत ना! जे त्यांच्या आई-वडिलांनी सहन केलेलं त्यांच्या जन्मापासून किंवा मग त्यांच्या लग्नानंतर. “अर्थात, तुम्हाला हे करावंच लागेल. पर्याय शोधूच नका याला.” तर असं हे चालतं. खरंतर प्रत्येक जण यातून जात असतो. पण बहुतांश वेळेला सगळे जण ह्या गोष्टी त्यांच्या जवळच ठेवणं सोयीचं समजतात. कारण एक विचार येतो ना मनात कि,आपले मित्र, कामातली मंडळी, किंवा मग माझा जोडीदार काय म्हणेल. पण ते सगळे सुद्धा तर याच गोष्टीला बळी गेलेले आहेत. 

आराखडा एकदम स्पष्ट आहे. मी नाही म्हणत कि, नातं तोडून या सगळ्या गोष्टी सुटतील. पण नात्याला रोख लावली तर मात्र एक निरोप नक्कीच जाईल समोरच्यांना. मर्यादा राखून वागण्याबाबत, खोट्या प्रेमाबाबत आणि त्यांचा अहम पणा कमी करण्याबाबत. सगळ्यात मोठं म्हणजे अपेक्षा, जी ते आपल्याकडून करतात. ते म्हणतील तसंच आपण राहायला किंवा वागायला हवं. जे अर्थात होत नाही आणि होणार ही नाही कधी.

जर वाटलं कधी चुकीच्या गोष्टी विरुद्ध आवाज उठवावा तर जरूर करा. मग काही फरक नाही पडत समोर तुमच्या विरुद्ध कोण आहे. तुमचा परिवार असेल किंवा मग नातेवाईक असुद्या. एक पाऊल पुढे जायलाच हवं! इतकं पुरेसं आहे सध्या. 

@UgtWorld

Related Posts