सगळीकडे आपली गरज नसतेच…

काही वेळेला गरज नाही, वेळ बघावी!

गरज

प्रत्येक वेळी आपण सगळ्यांसाठी काही करू शकतो असं नसतं. दरवेळी तुम्हाला सगळ्यांना खुश ठेवता येईल असंही नसतं. फरक असतो ना वेळेत. जिथे ज्याची गरज तिथे तीच व्यक्ती जवळ असणार. किंवा त्यावेळी तरी त्याच व्यक्तीची गरज असणार.

त्या क्षणापुरती गरज भागेलही पण जर नाही भागली तर मात्र आपण असतोच. ह्या आपण मध्ये ते सगळे येतात ज्यांना काही लोक त्यांच्या सोयीनुसार हाक देतात.

यात दुःखी होण्यासारखं काही नाही. उलट आपल्याशिवाय काहींची काम होतच नाहीत तर काहींची गरज भागत नाही. हो, पण एक गोष्ट आहे कि दरवेळी आपण असं असू असंही नाही. काही भेटी, काही सोबती क्षणिक असतात.

एकतर त्या फार आनंद देऊन जातील किंवा मग शिकवण. हा आता त्या शिकवणीत त्रास होणं भाग आहे. पण आयुष्याला त्याची साथ हवीच असते ना. चुकलो नाही तर बरोबर काय आहे, ह्याची कल्पना तरी कशी येईल?

एक गोष्ट आपण नेहमी विसरतो, ती अपेक्षा ठेवण्याची सवय. ही सवय पाहिजे असून सुद्धा जात नाही. जाणार पण नाही म्हणा! कमी होऊ शकते कदाचित. आता सगळं आपल्यावर च आहे तसं म्हणायला गेलं तर.

वाईट वाटून घेण्याच्या भानगडीत पडूच नका. कोणी तुम्हाला काही सांगत नसेल तर त्याची त्याची वैयक्तिक कारणं असू शकतात. सगळंच आपल्याला माहित हवं असं कुठे लिहून तर नाही ना ठेवलं…

@UgtWorld



Related Posts