का तोडतात एखाद्याचा अतूट विश्वास?

विश्वास तोडून नेमकं काय मिळतं?

का तोडतात एखाद्याचा अतूट विश्वास?

का करतात असं, का तोडतात इतक्या सहजतेने एखाद्याचा अतूट विश्वास. समोरचा तुम्हाला काहीतरी सांगतो. काहीतरी मनातलं तुमच्याजवळ वाटतो, ते ह्या हिशोबाने जेणेकरून तुम्ही ते कोणाला दुसऱ्याला सांगणार नाही.

पण असं होत नाही. ती गोष्ट रोमांचक असते! त्या क्षणी त्याबद्दल चर्चा करणं जास्त मजेदार वाटतं. वेळेनुसार जवळच्या व्यक्ती बदलतात मान्य आहे. मनातले भाव सुद्धा नव्या व्यक्तीकडे अगदी सहज व्यक्त होतात.आणि जुन्या गोष्टींना, जुन्या व्यक्तींना विसरतेची झालर घातली जाते. त्यांच्यासाठी ज्या गोष्टी महत्वाच्या असू शकतात त्यांना किंमत दिली जात नाही. त्यांचं महत्व कमी केलं जातं, चर्चेला विषय म्हणून बोलल्या जाऊ लागतात. असो! आता काय करू शकतो.

वेळ गेली सरून आणि आपण त्याचं काही देखील करू शकत नाही. आणि वाईट वाटलं तरी काही उपयोग नाही. त्याउलट ते झालं आणि पुन्हा असं काही न व्हावं याची दखल घेतली तर जास्त बरं होईल असं मला वाटतं. नका रे वाटत जाऊ भावना, स्वस्त नसतात त्या.

जीव असतो त्यात एक, जो घात करू शकतो साऱ्या गोष्टींचा. मग ते नातं असो किंवा मग नात्यातलं प्रेम. उगाच आगीशी खेळून जाळून जाण्यात अर्थ नाही. किंवा पाण्याची पातळी माहित असून त्यात पोहायला जाणं निरर्थकच असतं. मन जपायला शिका! नसेल जमत तर किमान मोडू नका. खूप त्रास होतो, खूपच जास्त…

@UgtWorld




Write with us✍?

Greetings for Everyone from TeamUgtWorld! Anybody who wants to write whatever his/her Heart wants to. They can now publish their content with us at our platform @Ugtworld. For more information click on the following link…

Related Posts