थोडंसं दूर सोशल मीडिया पासून…

स्वतःच्या सानिध्यात गर्दीपासून दूर!

थोडंसं दूर सोशल मीडिया पासून…

काही क्षण जेव्हा आपण आपल्या सानिध्यात राहत असतो. सगळ्या गोष्टींपासून दूर तेव्हा कळतं कि कित्येक गोष्टी राहून गेल्यात करायच्या. सुरुवात होते मग, आपण त्या कशा करू शकतो. करू शकतो का नाही? हा प्रश्न उभा राहतो. त्याची उलट तपासणी ही सुरु होत जाते.

पण खरं सांगायचं तर खूप बरं वाटतं त्या धावपळीच्या बनावटी सोशल मीडिया पासून लांब राहिल्या वर. त्यात तुम्ही कितीही खरे म्हणून राहा, काही उपयोग होत नाही त्याचा. कारण सगळ्यांनी आधीच ठरवलेलं असतं की हे सगळं खरं तर नक्कीच नसणार. त्यातून पुढे मग निष्कर्ष काढायला सुरुवात नको नको ते तर्क लावायला मोकळे सर्व जण.

खऱ्या आयुष्यात जगणारे फार कमी राहिलेत आज म्हणा. पण खऱ्या आयुष्यात जगायला हवं. सोबत आपल्या माणसांची लागतेच कधी ना कधी. सगळ्या गोष्टी एकांतात जरी होत असल्या तरी काही गोष्टीं पूर्णत्वाला नेण्यासाठी काही जण लागतातच. मी माझा वेळ खूप चांगला घालवला आहे ह्या सोशल मीडिया पासून काही काळ दूर राहून, तुम्हाला जमतंय का बघा!

@UgtWorld




Write with us✍?

Greetings for Everyone from TeamUgtWorld! Anybody who wants to write whatever his/her Heart wants to. They can now publish their content with us at our platform @Ugtworld. For more information click on the following link…

Related Posts