अगणित विश्वास आणि वेळेची सोबत!

तीच सोबत आणि तोच विश्वास, कायम हवा असलेला…

अगणित विश्वास आणि वेळेची सोबत!

अगणित विश्वास आणि वेळेची सोबत!

जेव्हा कोणी तुमच्यावर तुमच्यापेक्षा जास्त विश्वास ठेवतो. त्यामागे कारणं नक्कीच असणार त्याची वैयक्तिक किंवा मग तुमच्यात दिसणाऱ्या काही गोष्टींची. त्याचा खूप मोठा प्रभाव होतो आपल्यावर. काही दडून बसलेल्या गोष्टी मनातून निघून जातात आणि त्या सोबत आपल्या मनाचा भार कमी करतात. कोणी काहीही म्हणेल तुमच्या विरुद्ध पण एका व्यक्ती मुळे तुम्ही संपूर्ण जगाशी लढायला तयार असता.

गोष्टी मार्गी लागतात अश्या प्रकारे ज्यांची आपण फक्त कल्पना केलेली असते. ज्यामुळे हिरमुसलेल्या आत्मविश्वासाला नवी चालना मिळून जाते. जी आपल्या ताज्या आयुष्यासाठी फार गरजेची ठरते. मतभेदाचे मारे त्या अर्थी कमी जखमा करून जातात मनावर. मनात विचारांची गर्दी कमी होऊन धेय्याची वाटचाल कशी करावी याचं थोडंसं बळ मिळतं.

वेळ! सगळ्यांना माहित असतं कोण कोणासाठी किती आणि कधी काढत असतो. आपल्या गरज बघून काही जण गोडगोड बोलून वेळ खातात आपला. तर काही जण प्रामाणिक पणे स्वतःचा वेळ देऊन आपल्य्साठी उपलब्ध असतात. जी गोष्ट साधी सुधी नक्कीच नाहीए. वेळ देणं म्हणजे आयुष्यातलं सगळ्यात मोठं बक्षिस देण्यासारखं आहे.

@UgtWorld




Write with us✍?

Greetings for Everyone from TeamUgtWorld! Anybody who wants to write whatever his/her Heart wants to. They can now publish their content with us at our platform @Ugtworld. For more information click on the following link…

Related Posts