अचानक झालेल्या आवडत्या भेटी !

भेटी ज्या अचानक झाल्या तरी आपल्याशा वाटतात…

अचानक झालेल्या आवडत्या भेटी !

एखाद्या वेळी अचानक होणाऱ्या भेटी फार छान क्षण देऊन जातात. म्हणजे आपल्या व्यस्त आयुष्यात उमंगाचे चार चाँद लावून जातात. अचानक झालेली भेट अफाट प्रश्न-उत्तरे घेऊन येते. कित्येक काळापासून राहिलेले संवाद एकमेकांमध्ये गळेभेट करू लागतात. त्या आठवणी एकमेकांच्या मनात राहत असलेल्या, जणू यांच्यासाठी सणवारच आलाय.

आता अचानक भेट म्हणजे खानपान आलंच पण तेही त्या वेळेवर अवलंबून असतं. वेळ किती आहे आपल्याकडे ह्यावरून खानपानाच स्वरूप ठरतं. जर का जास्त वेळ असेल तर मग एखाद्या हॉटेल मध्ये जाऊन खायला पण जर नसेल तितका वेळ तर स्ट्रीट फूड आहेच किंवा टपरी वरचा चहा. ज्यांना कॉफी हवी ते कॉफी घेतात.

त्या छोट्या-छोट्या भेटीगाठींमध्ये वेगळाच स्पर्श असतो. स्पर्श आपलेपणातल्या शब्दांचा. लहान बाळाच्या निरागस उत्साहासारखा, ज्याला आपण कितीही उपमा देऊ पण शेवटी अनुभवातून घेता येणाऱ्या त्या आवडत्या आस्वदचा. प्रत्येकाने असा क्षण अनुभवला त्याच्या आयुष्यात जो क्षण ते विसरू शकत नाही.

@UgtWorld




Write with us✍?

Greetings for Everyone from TeamUgtWorld! Anybody who wants to write whatever his/her Heart wants to. They can now publish their content with us at our platform @Ugtworld. For more information click on the following link…

Related Posts