प्रेमाने सांगून कळत नाही ना!

सांगून-सांगून किती गोष्टी सांगणार पुन्हा…

प्रेमाने सांगून कळत नाही ना!
प्रेमाने सांगून कळत नाही ना!

गर्द रंग सफेद, त्यावर काळ्या रंगाची ओळ; तशी काही सत्य गोष्टींनी आपल्या आयुष्यात ठेवलेली जागा. त्या जागेला ना तर आपण बदलू शकतो किंवा त्यांना कायमचं सोडून देता ही येत नाही. मी कित्येक गोष्टी मांडल्या असतील मनातल्या पण काही या सतत आणि पुन्हा-पुन्हा मांडाव्या लागतात, त्याला कारण पण तसंच असत. सगळंच एकदा सांगून नाही कळत ना!

कारण हे जग आणि इथली माणसं, एकदा सांगून ऐकणाऱ्यातली नाहीत, त्यांना रोज रोज ते दर्शवून द्यावं लागतं. सारखं सारखं तेच सांगावं लागतं तेव्हा कुठे जाऊन ते त्यांच्या निदर्शनास येतं. यासाठी कित्येकदा भावनिक समूहातून जावं लागतं. यावेळी प्रत्येक भावनेला हाक द्यावी लागते. त्या हाकेत विरहाची साथ नक्कीच असते, ती साद अशी काही गुंजत जाते, जणू काही तिला साऱ्या गोष्टी एकत्र करून त्यातून पळवाट काढायची असते.

थोडं अवघड जात असेल, मला तरी वाटत आहे. सोपं करून टाकूया भावनिक विरह म्हणजे मनातील प्रत्येक भावनेला, मग ती कोणतीही असेना – सुखाची, दुःखाची, रागाची. त्या प्रत्येक भावना ज्या माणसाच्या मनात निजत असतात, त्या तेव्हाच जाग्या होतात जेव्हा त्यांना निमंत्रण दिलं जातं. हे निमंत्रण देणारं दुसरं तिसरं कोणी नसून आपसूकच परिस्थिती देत असते.

ही परिस्थिती च कारणीभूत ठरते माणसाची मानसिकता बदलण्यासाठी. त्या बदलत्या मानसिकतेमुळे भावनिक पणे माणसाचं मन बदलतं आणि त्यानुसार त्याच्या भावनाही बदलतात, अगदी सहजतेने! त्या बदलत्या भावना इतक्या घातक आणि तितक्याच सरळ सोजवळ असतात की, या व्यक्तीला त्या भावना सांभाळल्या जात नाहीत.

या सर्वाचा त्याच्या विचारशक्तीला इतका जास्त त्रास होतो की त्यांना आपलं अस्तित्वात असलेलं पात्र सोडून एक नवीन पात्र बनून जगावं वाटतं. साहजिकच आहे या सर्वांचा परिणाम त्याच्यासकट सभोवताली सुद्धा जाणवतोच!

@UgtWorld



Related Posts