असहाय्य भावनांचा बाजार…

आपल्या भावनांचा आदर करायला हवा!

असहाय्य भावनांचा बाजार…

सध्याच्या परिस्थितीला भावनांचा बाजार मांडून ठेवलाय. अनुत्तरित प्रश्न पुढ्यात मांडून ठेवलेत. ज्यांचा आढावा कोण घेऊ शकेल का हेच माहीत नाही. कसं माहित असणार! पर्याय कुठे ठेवलेले त्या व्यक्तीला शोधायला, ज्याला ह्या गोष्टी माहीत असाव्यात. त्या व्यक्तीने तर तोंडाला टाळं लावून घेतलेलं आहे.

स्वतःसमोर एक दरवाजा करून ठेवला आहे,ज्याचं कुलुप आणि चावी दोन्ही त्याच्याकडेच आहे. त्यामुळे दरवाजा ठोठावण्यापालिकडे कोणताच पर्याय उरत नाही. आणि एखादी व्यक्ती कितपत दरवाज्याबाहेर उभा राहील. जर त्याला एखाद्या क्षणाला कळलं की हा दरवाजा चुकलाय आता आणि त्याला उघडण्यास आपण असमर्थ आहोत. तो अर्थातच तिथून निघून जाणार यात काडीमात्र शंका नाही.

त्यालाही मन आहेच की, त्यालाही भावना आहेतच. कुठेतरी स्वतःच्या इच्छांपुढे त्या व्यक्तीला त्याने स्थान दिलेलं असतं. पण ते स्थान असं काही रिकामं केलं जातं जसं की आधीपासूनच ते रिक्त होतं. महत्वाचं म्हणजे दरवेळी याची जाणीव करून दिली जाते की त्या व्यक्तीच्या भावना आपल्या जवळ ठेवायला आपण किती असमर्थ आहोत.

याआधी मात्र आपणच जे काही आहोत ते आपल्या व्यतिरिक्त कोणीही सांभाळू शकत नाही. पण जेव्हा हीच दाद श्राप बनते तेव्हा सहन करण्यापलिकडचा असा सगळ्यात जास्त त्रास होतो. डोळ्यांत अश्रू, मनामध्ये त्रागा, नात्यांना अविश्वासात तोलणं दरवेळी हेच होतं. काही वेगळं होण्याची उमेद तरी काय असावी. कारण जरी सांगितलं की सगळी माणसं सारखी नसतात तरीही सगळीच माणसं आणि त्यांचं ते सारखं वाटणं हे जाणवू लागतं.

जोपर्यंत आपण त्याची समजूत घालून देत नाही तोपर्यंत. अर्थात पुन्हा विश्वास ठेवायला थोडं अवघड जातं पण एक व्यक्ती हे सारं बदलू शकते, नक्कीच बदलू शकते!

@UgtWorld

Related Posts