खरंच ‘लव्ह जिहाद’ की आणखी काही?

‘लव्ह जिहाद’ एक कल्पना की भयाण वास्तव!

लव्ह जिहाद

भारत देश जरी धर्मनिरपेक्ष देश असला, तरी देखील आपल्या देशावरील असलेला धार्मिक पगडा आपण नजरांदाज करू शकत नाही. भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला काही मूलभूत हक्क दिले आहेत,ज्यामध्ये प्रत्येक सजाण नागरिकाला ‘धर्म स्वातंत्र्याचा’ सुद्धा हक्क आहे. सद्ध्या धार्मिक वादाच्या बऱ्याच बातम्या ऐकायला भेटत आहेत. पण खरंच होणाऱ्या वादांना फक्त धार्मिक मतभेद कारणीभूत आहेत का? ‘लव्ह जिहाद’, कल्पना की आणखी काही! 

कोणताही धर्म होणाऱ्या अपराधांसाठी कारणीभूत असू शकतं नाही. माणसासाठी धर्म आहे, धर्मासाठी माणूस नाही. प्रत्येकाला आपला धर्म आपली श्रद्धा सांभाळण्याचा अधिकार आहे, पण त्यासाठी दुसऱ्या माणसांना त्रास देणे ही कोणत्याच धर्माची शिकवण असूच शकत नाही, ही मानवी विकृती आहे व ती प्रत्येक समाज वर्गात कुठे ना कुठे पाहायला मिळते.
मागील काही आठवड्यांपासून महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांमध्ये ‘लव्ह जिहाद’ या विषयावरून अनेक वाद होताना दिसत आहेत. पण ‘लव्ह जिहाद’ म्हणजे नेमकं आहे तरी काय? ही संज्ञा नक्की आली तरी कुठून? आणि घडणारे प्रकार खरचं लव्ह जिहाद चे आहेत का, की ह्या वाढलेल्या प्रकेरणामागे दुसरी काही कारणे आहेत हे जाणुन घेणं गरजेचं आहे.

‘लव्ह जिहाद’ म्हणजे, हिंदू किंवा दुसऱ्या धर्मातील मुलींना फुस लावून खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसवणे व फसवणूक करून किंवा अपहरण करून ,लग्न झल्यानंतर ‘ जबरदस्ती ‘ मुस्लिम धर्म स्वीकारायला भाग पाडणे.’लव्ह जिहाद’ किंवा ज्याला ‘रोमियो जिहाद’ देखील म्हणतात,ही संकल्पना २००९ मधे केरळ व कर्नाटकात घडलेल्या काही घटनांद्वारे पहिल्यांदा राष्ट्रीय स्तरावर निदर्शनास आली. त्यावेळेस एका पोलिस अधिकाऱ्याने एक अहवाल सादर केला होता, ज्यात नमूद केलं होत की, ‘केरळ मधे एक अशी संगठना आहे जी हिंदू मुलींना प्रेमाची फुस लावून मुस्लिम धर्म स्वीकारला भाग पाडते.’ हा अहवाल तत्कालीन न्यायमुर्तीनी मान्य केला आणि असा निष्कर्ष काढला की लव्ह जिहाद हे ‘जबरदस्ती’ केल्याजाणाऱ्या धर्मांतराचे संकेत आहेत.नंतर या विषयाला केरळ व कर्नाटकातील राजकारण्यांनी हवा दिली, आणि ही बाब वणव्या सारखी पसरली.

लव्ह जिहाद

दोन महिन्यापूर्वी अमरावती (महाराष्ट्र) मधल्या एका घटनेने चांगलच वातावरण तापलं होतं. मुलीच्या ‘पालकांच्या’ म्हणन्यानुसार त्यांच्या ‘उच्च शिक्षित’ मुलीला एका मुस्लिम मुलाने प्रेमाची फुस लावून ‘पळवून’ नेलं व ‘जबरदस्ती’ लग्न लावून देण्यात आलं तो पर्यंत त्या मुलीला प्रेम करत असलेल्या मुलाची जात, त्याचा धर्म देखील माहीत नव्हता. जेव्हा मुलगी ‘भेटायला’ परत घरी आली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.म्हणून ह्या प्रकारणाला हिंदुत्व वादी विचाराच्या लोकांनी उचलून धरलं व ही घटना लव्ह जिहाद ची असल्याचं सांगण्यात आले.

अश्याच अनेक घटना आपल्या आजू बाजूला घडत आहेत. मुलींसोबत झालेल्या या घटना हृदयद्रावकच आहेत. पण मला वाटत, फक्त लव्ह जिहाद ला दोषी मानावे तर ती एक तर्फी भूमिका झाली. टाळी कधी एक हातानी वाजत नाही. तुम्ही जर ह्या घटना नीट अभ्यासल्यात तर तुम्हाला कळेल की लव्ह जिहाद ला बळी पडलेल्या अनेक मुली ह्या उच्च शिक्षित होत्या, सजाण होत्या. मग प्रेम करण्यापूर्वी त्यांनी मुलाबद्दल चौकशी का केली नाही? जरी प्रेम आंधळ असल तरी शिक्षणाची ज्योत तर तुमच्याकडे होती ना! जर माणूस स्वतःसाठी काय चूक आणि आणि काय बरोबर हे जर समजू शकत नसेल, तर त्या उच्च शिक्षणाचा काय फायदा? याला जेवढी कारणीभूत गुन्हेगाराची वैचारिक विकृती आहे, तेवढंच बळी गेलेल्या मुलींचं वैचारिक अपंगत्व देखील कारणीभूत आहे.

लव्ह जिहाद

या घटना थांबवण्यासाठी कोणत्याही धर्माला दोष देण्यापेक्षा देशातील महिलांचं सशक्तिकरण व त्यांच्यात जागरूकता होणे अतिशय गरजेचं आहे. खरंतर “लव्ह जिहाद” ह्या संघटनेच्या अस्तित्वाचे कोणतेही ठोस पुरावे अद्याप तरी सापडले नाहीत. काही काही वेळा आपल्या मुलीने दुसऱ्या धर्मातल्या मुलाशी लग्न केलं हेच पटत नसल्याने पालक सुद्धा टोकाचे निर्णय घेऊन, लव्ह जिहादच्या केसेस फाईल करतात. राजकारणी आपल्या फायद्यासाठी अश्या गोष्टींना बढावा देतात.

अशा घटना प्रत्येक धर्मात कुठे न कुठे घडताना दिसून येतात, घडणाऱ्या घटनेला धार्मिक वळण देऊन त्याचा गाजावाजा करणं अतिशय चुकीचं आहे.आपल्या देशात सर्व धर्म एक सोबत राहतात. धार्मिक वादांमुळे देशात फक्त आणि फक्त असंतुष्टी वाढू शकते व ती टाळण्यासाठी प्रत्येकाने जाणीवपूर्वक गोष्टीचा विचार करणे गरजेचे आहे.

सुहानी ✍️


Write with us✍?

Greetings to Everyone from TeamUgtWorld! Anybody who wants to write whatever his/her Heart wants to. They can now publish their content with us on our platform @Ugtworld. For more information click on the following link…

Related Posts