त्या भेटीसाठी केलेली उठाठेव सुद्धा एक ऍडवेंचर होता…
पावसाचे दिवस म्हटलं की, ट्रेन प्रॉब्लेम, पाणी भरणं, ट्रॅफिक जॅम बरंच काही होतं. त्याउलट आपल्या पार्टनर सोबत फिरणं, त्या पावसात भिजणं आणि काही स्पेशल फ्रेंड्स ची गँग घेऊन त्याला एन्जॉय करणं हे अगदी भारी असतं. म्हणजे पावसात मजाही येते, अडचण ही होते आणि ऍडवेंचर्स पण होतात. एक असंच ऍडवेंचर आम्ही केलं त्या पावसाच्या दिवसात. खरं सांगायचं तर ते करण्याचं कारण असं की आमचा एक खूप स्पेशल डे होता सेलिब्रेशन करण्यासाठीचा. आमच्या गँग मधले हाफ मेंबर कुर्ला ला राहायला आणि हाफ मेंबर कल्याण-डोंबिवलीला.
आदल्या दिवशी भेटलो सगळे की उद्या मित्राच्या घरी भेटायचं असं आणि तो राहतो कल्याण ला आणि आम्ही सर्व त्यावेळी होतो ते कुर्ला स्टेशनवर. त्या दिवसापासूनच चालू होता पाऊस आणि आम्हांला वाटलं कमी होईल रात्री आणि उद्या पर्यंत ओसरून जाईल. आमची हाफ गँग निघाली घरी जायला,त्यात दोन मुली, सोनाली आणि निमिषा आणि दोघं मित्र, हर्ष आणि निनाद होते. मी पण त्यांच्या सोबत च जाणार होतो कारण ते दोघं जिथे राहतात तिथेच जवळ मी पण राहतो. पण त्या दिवशी मी माझ्या रिलेटिव्ह कडे गेलो होतो आणि ज्यांच्यासोबत गेलो होतो त्यात एक मैत्रीण जिया, मित्र शैलेश आणि मी असे तिघेजण होतो आम्ही. त्या रात्री तर पाऊस खूप जोरात होता. सगळे मॅसेज करून उद्या भेटूया की नको असं बोलत होते.
रात्रीची वेळ संपून सकाळ होत आली तरी अजून पाऊस काही थांबला नव्हता. मला हर्ष चा कॉल आला की,”ट्रेन बंद आहेत.कसं काय ते बघ आणि काही पण कर पण त्यांना घेऊन ये!” माझ्या सोबतचे दोघे,ते त्यांच्या घरी होते आणि मी जिया ला मॅसेज केला,”ट्रेन स्लो आहेत,जरा लवकर निघुया म्हणजे पोहचू लवकर.” तिला मी हे सांगितलं नाही की ट्रेन बंद आहेत आणि लकिली त्यांच्याकडे लाईट नव्हती, नाहीतर न्युज मध्ये तिला कळलं असतं की ट्रेन्स बंद आहेत आणि सगळीकडे पाणी भरलंय. शैलेश चा समोरून च मॅसेज आला,” यार ट्रेन्स बंद आहेत तर कस जाणार? जिया ला सांगितलंय का तू हे सगळं?” मी त्याला बोललो,” नाही, तिला सांगितलंय की स्लो ट्रेन्स आहेत आणि जाण्यासाठी एक ऑप्शन आहे, तू ये तयारी करून. मी तिला पण बोलावतो.”
आम्ही तिघे रिक्षास्टॅण्डला उभे राहिलो, तिथून रिक्षा पकडून स्टेशन ला आलो. आता यांना सांगितलं नव्हतं की आपल्याला बस ने जायचं आहे आणि यावर हे कसे रीऍक्ट होणार हे सुद्धा मला माहित होतं कारण दोघांनाही बस ने ट्रॅव्हल करायला आवडत नाही. जिया ने विचारलं, “ट्रेन्स तर बंद आहेत, पुढे जातंच नाहीये मग जाणार कसं?” मी म्हटलं,” बस ने जायचंय आपल्याला!” “मी येणार नाही. मला नाही आवडत रे बस ने ट्रॅव्हल करायला,तुम्हाला माहीत आहे ना!”,जिया बोलली. शैलेश बोलला,”त्यांनी सगळी तयारी करून ठेवलीय आणि तुला माहीत आहे, आजचा दिवस तुझ्यासाठी आणि आमच्यासाठी खास आहे.” तितक्यात निमिषा चा कॉल आला,”निघाले का तुम्ही? कसे येणार आहात?” मी म्हटलं,”बस ने येतोय आम्ही. पोहचलो की कॉल करतो तुला.
“जिया ला कसंबसं मनवलं आणि बसस्टँड ला जाऊन उभे राहिलो. 1 तास थांबल्यानंतर शेवटी बस आली. गावाला जाणाऱ्या बेस्ट च्या बसेस होत्या आणि वाया कल्याण होती हे वाचलं आणि लगेच बसलो. जिया माझी खूप खास मैत्रीण, ती आणि मी पहिल्यांदा एकत्र बस ने ट्रॅव्हल करत होतो. “टेन्शन नको घेऊ. तू माझ्यासोबत बोल,तुला कळणार पण नाही टाइम कसा निघून जाईल ते!”,तिला म्हटलं. शैलेश पण तिला बोलला,”आहोत ना आम्ही! तू नको काळजी करू. आमचे साहेब बसलेत ना बाजूला मग!” आमची एक मैत्रीण सोनाली, तिला येताच आलं नाही त्या दिवशी कारण तिच्या इथे पाणी भरलं होतं. आमची सवारी निघाली 11.30 ला आणि ती बस 1.45ला कल्याण ला आली. कुर्ला ते कल्याण, मीसुद्धा पहिल्यांदाच बस ने जात होतो कारण ट्रेन असल्यामुळे बस च्या प्रवासाचं काही कारणच नव्हतं. त्या ट्रॅव्हलिंग मध्ये आम्हांला 4-5 कॉल्स येऊन गेले होते आमच्या गँग चे जे ऑलरेडी पोचले होते,तस ते कल्याण च्या आसपास राहत असल्याने रिक्षा करून आलेले.
फायनली आम्ही त्या मित्राच्या घरी पोचलो एकदाचे. तेव्हा त्याची मम्मी होती घरी म्हणा पण आम्ही आलो आणि त्या रिलेटीवकडे निघून गेल्या. पाऊस होताच त्या क्षणी सुद्धा पण रिमझीम असा होता,जास्त नाही. आमचं सेलिब्रेशन करायला कसं कसं आलो आणि काय काय सांगावं लागलं यांना कल्याण ला आणायला यावरच चर्चा चालू होती बराच वेळ आणि मग आम्ही आमचं सेलेब्रेट करायला चालू केलं. तो दिवस आमच्या फ्रेंड्शिप साठी खूप स्पेशल होता,त्या दिवशी दोन बर्थडे होते आणि असंच काहीतरी स्पेशल होतं. खूप मस्ती केली आम्ही आणि मजा अशी की निमिषा ने जेवण करून ठेवलेलं आणि तिला हेल्प म्हणून ते हर्ष आणि निनाद पण होते. केक इतका मस्त होता ना! हाफ हाफ नेम्स लिहिले होते त्यावर आणि गिफ्ट्स तर ऑसम होते यार,लाईफमधले वन ऑफ द बेस्ट अशेच! सेलिब्रेशन करून निघालो आम्ही.
मला जिया आणि शैलेश सोबत जाणं भाग होतं कारण माझे रिलेटिव्ह वाट बघत होते. स्टेशन ला आलो पुन्हा पण ट्रेन अजून चालू नव्हत्या झाल्या. ठाणे पर्यंतच जात होत्या. आता करायचं काय आणि त्यात जिया च्या फॅमिली चे कॉल येत होते, पोहचणार कसे काय आता?.. बसस्टँड ला गेलो तर ते बोलले की, इथून मुंबईला नाही जाऊ शकत कारण बंद आहेत इथून. तिथून येणारी शेवटची बस 7 ची होती आणि आम्हांला8 वाजले होते स्टेशन ला यायलाच. तिथे रिक्षा उभ्या होत्या, ते रिक्षावाले विचारत होते ,कुठे जायचं वैगरे,आमचं बोलणं चालू होतं आणि त्यात टॅक्सी वाले खूपच पैसे सांगत होते. शेवटी एक रिक्षावाला तयार झाला आणि थोडं बार्गेनिंग करून आम्ही बजेट कमी केला आणि निघालो अगेन कुर्ल्याला. ऍडवेंचर होता ना, इतका स्मूथ कसं चालेल! येताना तसं आणि जाताना पण काहीतरी हवंच ना, तसंच झालं. रिक्षा मधला गॅस टँक संपला आणि आम्ही तेव्हा बायपास ला पोहचत होतो,आता काय करायचं? “तुम्ही काळजी नका करू. तुम्हांला दुसरी गाडी बघून देतो.” असं बोलून त्याने एक टॅक्सीवाल्याला थांबवलं. त्याच्या ओळखीचा होता म्हणे तो आणि त्याने आम्हांला तितक्याच पैशात कुर्ला ला सोडेल असं बोलणं करून दिलं.
त्या टॅक्सीत बसलो आम्ही आणि पुन्हा आमची राईड चालू झाली. जिया बोलत होती,”हे सेलिब्रेशन, ही ट्रॅव्हलिंग, हे दिवस कधीच नाही विसरणार मी!” शैलेश पण बोलला,”आपला ऍडवेंचरवाला दिवस झालाय आजचा एकदम मस्त!” जिया बोलली,”हो ना, सकाळी बस नंतर रिक्षा आणि टॅक्सी पण, खूप छान अँटिक दिवस होता लक्षात राहील असा!” जाई जाईपर्यंत पुन्हा आमच्या गप्पा चालू झाल्या. तासाभरात आम्ही कुर्ल्याला पोहचलो कारण पाऊस कमी झालेला आणि रस्त्याला ट्रॅफिक सुद्धा नव्हतं. त्या दोघांनी मला हाफ वे मध्ये सोडलं आणि ते पुढे निघून गेले. असा हा पावसातला ऍडवेंचरस सेलिब्रेशन आमचं आणि आमची गँग ते कधीच विसरणार नाही,मी तर नाहीच नाही!
- 10 Promising career Opportunities in Artificial Intelligence (AI)
- The Hidden Crisis of Overworked Workers in India
- 10 Best Places to Visit in India During Navratri
- The Business of Entrance Exams in India
- How to Treat Girls/ Women?