डोळ्यातली भूक आणि भुकेचं वय…
भुकेला वय नसतं असं खूप कमी जणांना माहित आहे. त्यामागचं कारण असं कि आपण बघत आलोय लहान मुलांची भूक डोळ्यात असते. त्याला हवं खूप असतं, पण त्यांची भूक मात्र थोडीशीच असते. मोठ्या माणसांचही काही वेगळं नसतं. पण त्या माणसांमध्ये फरक असतो. कारण प्रत्येकाला दोन वेळेचं जेवण मिळेलच असं नाही ना! त्यांची भूक देखील डोळ्यातच असते. आपल्या हातातल्या पैश्याकडे बघून ठरणारी. जितकं आपल्या खिशाला परवडेल तितकंच काय ते खायचं.
कधी सोबत असतात त्यांच्यासोबत दोन घास वाटले जातात. आपल्या वाटेचं आपण त्यांना थोडं खाऊ घालतो तर कधी कोणीतरी आपल्याला खाऊ घालतं. पण ज्यांना सोबती नाही त्यांना मात्र आपलं आपलंच भुकेचं पारडं सांभाळावं लागतं. खिशाला कात्री बसली की, भूक आवरावी लागते, मौज मजेला तात्पुरता का असेना पूर्ण विराम द्यावा लागतो. नेहमी नाही राहत म्हणा वेळ सारखी पण एकदा तरी एक क्षण भुकेची किंमत नक्कीच दाखवून जातो.
आपल्या आयुष्यात अशा किती तरी घडामोडी होताना आपण पाहत असतो. कधी कधी अशी वेळ आपल्यावर ही आलेली असते. महिना अखेर आला की, हातात किंवा बँकेत बोटावर मोजण्याइतके पैसे असतात आणि आपल्याला त्याच पैशात पुढचे काही दिवस घालवायचे असतात. त्यातून ही जेव्हा अकाउंट मधले पैसे काढणं मुश्किल असतं कारण ते आपण काढूच शकत नाही इतके कमी असतात. पण आजकाल जे काय UPI चा वापर आहे त्याने ते न काढू शकलेले पैसे वापरता येतात अगदी अशक्य अशा वेळी. हा पण त्यांचं नुकसान असं की जर का फोन बंद झाला तर गोष्ट संपली.
त्यामुळे किती ही कॅशलेस राहायचं म्हटलं तरी काही ठिकाणी कॅशच चालते. तिथे आपल्याला गप बसून घ्यावं लागतं. जेव्हा खिसा आणि अकॉउंट दोन्ही कॅशलेस असतं तेव्हा तर काही विचारायलाच नको. पण भूक तर असतेच ना सतत… तिला कोण टाळू शकेल. घर आणि पोट दोन्ही सारखंच कधी रिकामं बरं तर कधी भरलेलं छान. पण रोज वाजवीपेक्षा जास्त भरलेलं अजीर्ण नक्कीच होऊ देईल. थोडेसे पैसे आणि असहाय्य भूक सध्याच्या जीवनाची छोटीशी कहाणी झाली आहे. कधी ना कधी ती जगावी लागते, आयुष्यात एकदा तरी.
Write with us✍?
Greetings to Everyone from TeamUgtWorld! Anybody who wants to write whatever his/her Heart wants to. They can now publish their content with us on our platform @Ugtworld. For more information click on the following link…