शब्द कमी आणि भावना अनेक असणाऱ्या चारोळ्या…
मराठी चारोळ्या कित्येक प्रकारच्या असतात. ज्यात प्रेम, मैत्री, राग आणि बरेच भाव दडलेले असतात.
आपण जे क्षण अनुभवतो ते सगळ्यांना शब्दात मांडता येतात पण मोजक्याच शब्दात मांडणं म्हणजे चार ओळीत सगळं सांगणं हे फार कमी जण करतात.
अशाच मोजक्या शब्दांनी पण आयुष्यातल्या अनेक भावना दडलेल्या ह्या चारोळ्या आहेत. ह्या वाचून आपला वेळ नक्कीच छान जाईल…
जाणीव हवी होती व्हायला
आता ती होत ही नाही म्हणा,
वेळ बदलली, मन बदललं
आता प्रेम राहील नाही बहुतेक पुन्हा…
प्रेम नसतं संपत मनात
फक्त त्याच वर्चस्व कमी होतं,
विरह, दुरावा, गैरसमज, अबोला
यानेच जे काय होतं ते होतं…
Nice
Thank you for your feedback.
Beautiful Words
Thank you so much Manoj…