नवी ओळख उमेदीची…

ओळख जी पात्र घडवते!

नवी ओळख उमेदीची…

एक नवी ओळख मिळाली काही दिवसांत. वेगळं असं काही नव्हतं म्हणा पण प्रतिसाद मिळालाच तसा तर जाणवलं तसं काहीसं. शब्द असे मिळत गेले आणि व्यक्ती असे काही भेटत गेले की, त्यांनी जाण करून दिली.

जास्त काही अवजड असं ज्ञान नाही मिळालं पण एक दोन गोष्टी फार चांगल्या कळून चुकल्या. त्यातली एक म्हणजे कर्तृत्वाची ताकद कधी कमी पडत नसते, कमी पडतो तो म्हणजे आपला आत्मविश्वास. दुसरी गोष्ट अशी कळाली की, स्वतःच्या काही खास गुणांची कधीही मस्करी करू नये. ते म्हणतात ना, “तुला गॉड गिफ्ट मिळाली आहे ही गोष्ट, तुझी स्पेशालिटी आहे ती. त्याला जपून ठेव किंवा त्याचा तू योग्य वापर कर”.

तसं बघायला गेलं तर सर्वांनाच काही ना काही मिळालेलं असतं. ते शोधायला जरासा वेळ जातो किंवा सापडायला ही वेळ जात असावा, पण वेळ त्या दरम्यान कधीही वाया जात नाही. तो वेळ आपण बऱ्याच गोष्टी शिकण्यात गुंतवलेला असतो. आयुष्यातल्या कित्येक पाऊलावर आपल्याला असे म्हणणारे बरेच मिळतील. कि इतकी वर्षे काय केलंस? ना गुंतवणूक केलीस, ना धड नोकरी केलीस, ना आणखी काही. पण त्यांना एक गोष्ट कळत नाही की सगळ्यांना सारखं जीवन मिळालेलं नसतंच मुळात. प्रत्येकाचं राहणीमान, बोलणं-चालणं वेगळं असतंच त्यात तुम्ही कितीही साम्य शोधण्याचा मूर्खपणा म्हणूया किंवा मग त्यांच्यात तुलना करण्याचं घाणेरडं काम म्हणूया ते करुन दाखवताच.

प्रत्येकाला त्याच्या आयुष्याची वाट निवडावी लागते. ती दुसऱ्याच्या सांगण्यावरून कोणी कधी निवडत नसतो. दिसण्यापरी जरी असं जाणवलं किंवा वाटलं तरी ते तसं नसतं. कारण जे आपल्याला वाटतं तेच आपण करतो हे जगजाहीर सत्य आहे. त्यावर कितीही मोठी खोटेपणाची झालर लावली तरीही त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे कुणाच्या सांगण्यावरून आपल्यात बदल करणं थोडं खटकल्यासारखं वाटतंच. ते वाटणं अगदी योग्य आहे. ते आपल्यासाठी अपर्यायी आहे. या सगळ्यातून सर्वाना दुर्लक्ष करत जेव्हा पुढे जायचं आपलं ठरतं तेव्हा मात्र आपल्याला या सगळ्या कसल्याही गोष्टींची किंवा माणसांची आठवण येत नाही. आणि एका अर्थी ते बरंच आहे. उगाच कुणा दुसऱ्याच्या विचारांचा बोजा आपल्या डोक्यावर का म्हणून वागवायचा. इथे आधीच कमी गोष्टी आणि विचार नसतात की त्यात आणखी हे पाहुणे कशाला हवेत नाही का!

अभिप्राय घ्यावा प्रत्येकाकडून पण मत मांडू देऊ नये, कारण त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो. आता मत मांडू न देने हे आपल्या हातात नसतं. कारण कीहीही अडवलं तरी कोणी बोलायला थांबत नाही. अभिप्राय हा थोडक्यात निभावता येतो पण मत हे थोडक्यात आवरता येत नाही. संवाद वाढत जातात गोष्टी गुंतत जातात, विचार आदळतात एकमेकांवर आणि शेवटी मतभेदांचा पाऊस पडतो. ज्यात भिजता ज्याला येईल तो सुटेल यातून सहज अगदी सहजपणे. पण ज्याला तसं करता येणार नाही त्याच मात्र काही खरं नाही.

त्याला तर हे सगळं जडच जाईल सावरायला. कारण मत मांडणं म्हणजे जवळजवळ तर्क लावून मोकळं होण्यासारखंच आहे. ज्याने वाद होऊन समजूत कमी पडण्याची वेळ सुरु होते. आणि समजूत नसेलच तर संपल्यातच जमा सगळं. आपली ओळख ही आपल्या रित्या जरी तयार होत असली तरी सुद्धा त्याला सोबत म्हणून एक वेगळी ओळख देखील तयार झालेली असते. फक्त ती ओळख वेळेनुसार आणि मतांनुसार बदलत जाते किंवा मग सगळ्यांसमोर येते. त्याला आपण काहीही करू शकत नाही.

जसं आपल्या सगळ्यांना माहित असतं वाहत्या वाऱ्याला आणि आपल्याबाबतीत मत तयार व्हायला कोणी रोखू शकत नाही. जर ओळख असेल तर तिला एक नवी ओळख व्हायला वेळ नाही लागत.

@UgtWorld



Related Posts

2 thoughts on “नवी ओळख उमेदीची…

Comments are closed.