नातं मैत्रीत असलं की वेगळंच असतं…
रेल्वे स्टेशनच्या जवळपास असणाऱ्या एका हॉटेलच्या आवारातून काही मित्रमैत्रिणी बाहेर येतात. एकमेकांच्या गप्पांमध्ये मग्न असलेले ते त्या रेल्वे स्टेशनला पोहचतात. नातं आणि मैत्री काही प्रमाणात एकसारखी असते तिथे एकांत ही दिला जातो आणि तो हिरसवून ही घेता येतो. त्यांच्यातले दोघे जण प्लॅटफॉर्मच्या शेवटाला एका बाजूला उभे राहतात आणि बाकीचे त्यांना पाहून तिथेच थोडं पुढे जाऊन थांबतात. श्रद्धा ललितवर रागारागाने ओरडत असते. आजूबाजूची माणसं त्यांच्याकडे बघून निघून जात होती, कारण त्यांचे बाकीचे मित्रमैत्रिणी त्यांच्या जवळपासच होते.
ते तिला विचारण्याचा प्रयत्न करतात पण ती इतकी रागात होती कि, ती त्यांच्याकडे लक्षच देत नाही तिचं सगळं लक्ष फक्त त्याला बोलण्याकडेच होतं. तिचा रागाचा पारा वाढत चालला होता कारण तो फक्त तिच्याकडे बघत उभा होता काहीही न बोलता. आणि हे बघून ती अजूनच चिडचिड करत होती. तिला तिच्या प्रश्नांची उत्तरे हवी होती कुठल्याही परिस्थतीत. एका गैरसमजाचा आपण शिकार झालो आहोत हे त्याला कळालं होत. कारण तिच्या प्रश्नांमध्ये त्याच्या काही गोष्टींचा इतका उल्लेख होता कि ते तो नाकारू शकत नव्हता.
पण त्याच्या मनात त्यावेळी तिची काळजी जास्त होती त्या विचारांऐवजी. आणि त्या क्षणी तिला शांत करणं फार गरजेच होत. सतत बोलत असल्याने तिला होणारा त्रास त्याने सहज ओळखला आणि तिला लागलेल्या ठसक्याने तिच्या आवाजात झालेला हलकासा बदल पण लगेच कळून आला होता. हातात असलेली पाण्याची बॉटल तिला देऊ करून सुद्धा तिने ती बाजूला सारली. त्याच काळजीपोटी तो तिला शांत करण्याच्या प्रयत्नात होता. काही गोष्टी तिला जाणून घ्यायच्या होत्या कि त्या कितपत खऱ्या आहेत ज्या तिला सांगण्यात आल्या होत्या. तिने लावलेला अंदाज चुकीचा नाही आहे असं तिला वाटत होतं.
नेहमीच्या बोलचालीतलं त्यांच्यातल तिचं ते पहिलं भांडण होतं. कारण आजवर असं काहीही कधी झालेलं नव्हतं. जेणेकरून त्यांच्यात अशाप्रकरचा वाद होईल. अगदी जवळचे बेस्ट फ्रेंड्स ते दोघे. त्यामुळे बाकीचे हैराणच होते हे सगळं पाहून. ती इतकी भडकेल हे कुणालाच वाटलं नव्हतं, कारण या आधी ती असं कधी वागलीच नव्हती. नेमकं काय चाललंय हे समजणं खूप अवघड होत चाललेलं, त्यात तिला सावरणं ही मुख्य बाब होती.
पण हे फक्त तोच करू शकत होता. त्याला कारण असं की, कुणा तिसऱ्याच मध्ये येणं तिला बिलकुल आवडत नव्हतं आणि हे त्या सगळ्यांना माहित होतं. काही वेळ शांत राहण्यासाठी तो तिला तिथे बाजूला असलेल्या बाकडयावर बसवतो आणि तो स्वतः आपल्या गुढघ्यावर तिच्या पुढ्यातच बसतो. त्यांची गॅंग पण तिथेच असते. ते पण त्यांनाच बघत असतात. निदान आता तरी ती शांत होईल काही वेळासाठी का होईना, पण तिच्या मनात त्याच्याबद्दल राग निर्माण झालेला. त्याचबरोबर विचारांचा डोंगर तयार झाला होता की हा असं का करेल.
आणि काय असं झालंय याला जेणेकरून हा असा वागला असेल. त्यांच्यातलं एक गुपित कळलंय बाकीच्यांना असं तिला वाटलं होतं आणि ते कळायला नको होत असं तिचा आग्रह होता, पण ते त्याने सांगितलं नाही हे तिला पटत नव्हतं. या रागापोटी ती त्याला नको नको ते बोलत होती. तिच्या पाणावलेल्या डोळ्यातून बोलता बोलता पाणी आलं आणि आता तिला रडू आवरेना. तो उठून तिच्या बाजूला बसतो आणि तिला आपल्याजवळ घेतो, ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून रडू लागते.
“का? का असं केलंस?” त्याने दिलेल्या रुमालाला आपल्या मुठीत आवळून ती त्याला विचारत होती. त्या हुंदके देणाऱ्या आवाजात तिच मन किती दुखावलं गेलंय हे त्याला कळत होत. तिचे डोळे पुसून तिला सावरत तो शांतपणे सांगू लागला “मी असं काहीच केलेलं नाहीये ज्याने तुला त्रास होईल आणि असा कधी विचार सुद्धा केला नाही. माझ्यावर विश्वास ठेव. मी आजपर्यंत आपल्यातली एकही गोष्ट कुणालाही सांगितलेली नाही खरंच अगदी तुझी शपथ. पण ज्या गोष्टी त्यांना कळाल्या असं तुला वाटतंय त्या चुकीच्या असू शकतात ना! आणि कदाचित आपल्या वागण्यामुळे त्यांना तसं वाटलं असावं.”
“आपल्यातील वागणूक ही आपणचं समजू शकतो हे तुलाही माहित आहे आणि मलाही माहिती आहे. त्यामुळे ते ही गोष्ट नाही समजणार. तू इतकं का मनाला लावून घेतलंस. त्यांचे अंदाज खरे असतील किंवा खोटे असतील. ते आपल्यावर आहे ना, कि त्यांना काय सांगायचं आणि काय नाही. मला मान्य आहे काही गोष्टी त्यांच्या नजरेखाली आल्या असणार आणि त्यावरूनच ते असं म्हणत असतील तुला त्याच जर तुला वाईट वाटलं असेल ना तर त्यांच्याकडून मी माफी मागतो तुझी. त्यांनाही माफ कर. आणि जर मीच चुकीचा वाटतं असेल तुला तर मलाही माफ कर.”
“कोणी समजो ना समजो मी समजतो तुला आणि चांगलं ओळखतो देखील त्यामुळे कोणालाच स्पष्टीकरण देण्याची गरज नाहीये. आपलं नातं हे फक्त आपल्याच जवळ ठेऊ. मैत्रीत काळजी असते ते पण प्रेमच असतं फरक इतकाच की त्यात काही गोष्टी जराश्याच वेगळ्या असतात आणि हे तुला माहित आहे.” तो तिला समजावत होता बराच वेळ. काही वेळ शांत होऊन ती म्हणाली “ललित काहीही असेल अगदी काहीही तर आधी मला सांगत जा ,असं कुणाकडून माझ्याबद्दलच वागणं ऐकणं मला नाही आवडत.”
“मी सांगते ना तुला सरळ स्पष्ट तू ही तसंच करत जा. सो प्लीज पुन्हा असलं काही नकोय मला आणि आय एम सॉरी. बरं मला एक सांग मी मारलं नाही ना तुला.” “नाही अजिबात नाही, का?” “अरे यार बघ ते तर राहूनच गेलं, मारण्याचा चान्स मिस झाला रे.” “ऐ! जे केलंस ना तेच भरपूर आहे आणि चला आता सगळे वाट बघत आहेत आपलीच.”