कॉन्टेन्ट आणि त्यातला उघड दिखावा!

आजकाल आपण जे जे सोशल मीडिया वापरतो त्यावर फक्त एकच गोष्ट झळकते. ते म्हणजे कॉन्टेन्ट. सगळ्यांना नुसतं फेमस व्हायचं आहे. मग त्यासाठी काहीही करायचं आणि कोणत्याही थराला जायचं. हल्ली तरी तेच सर्वत्र आहे. अर्ध नग्न कपडे, नको नको त्या डान्स स्टेप्स, असं बरंच आहे म्हणा. मुख्यतः आजकाल मधुचंद्र हि सोशल मीडिया वर साजरा होतोय म्हणजे काय! यापुढे तर काय बोलायलाच नको.
काही जण म्हणतील करू दे काय करायचं त्यांना. त्यांचं आयुष्य आहे. घालूदे कसे कपडे घालायचे ते, तुम्ही विचार बदला ना. विचार लाख चांगले असतील हो, पण जे करत आहेत त्यांचं वय काय आहे ह्याचा अंदाजा घेता आला तर बघा. शिक्षण घेण्याऐवजी कोणती शिकवण घेत आहेत ते तरी बघून घ्या एकदा. आधीच या वातावरणामुळे कित्येक जणांचं शिक्षण पाण्यात आहे. त्यात हि भर म्हणजे “सोने पे सुहाना” असंच झालं ना!
अश्लील व्हिडीओस, त्यात होणाऱ्या फसवणूका, पैसे हडपणे, प्रेमाची खोटी नाती निर्माण करून मनाचा आणि शारीरिक फायदा घेणे. कोण समजेल ह्या गोष्टी. कित्येक जण सांगत ही असतील ह्या बाबतीत पण त्याचं गांभीर्य कोणालाही उमगत नाही. सोशल मीडिया आणि त्यातला कॉन्टेन्ट हा फार टोकाला जाऊन पोहचला आहे. त्याचं अजून विश्लेषण येणारा काळच करून देईल आपल्याला.
- History of fashion part-4
- History of fashion part-3
- History of fashion part-2
- Brief History of fashion part-1
- Elements and principles of fashion design