टॉपिक कशाला, छोटंसं कारण पुरेसं आहे!

टॉपिक

टॉपिक काय पुष्कळ मिळून जातात बोलण्या बोलण्यातून आपल्याला. कधी कॉलेज मधली गाऱ्हाणी तर कधी ऑफिस मधल्या कुरघोडी. निवांत वेळ काढून बसलेली घरातली मंडळी. तर त्याच उलट धावपळीत भेटलेले मित्रमैत्रिणी. चिक्कार गोष्टी आणि असंख्य विषय असतात बोलायला आपल्या जवळ. मजा येते बऱ्याचदा आपल्याला पण कधी कधी वाद होतात किंवा मग तिरस्कार. आता ते त्या वेळी बोलण्यात असलेल्या टॉपिक मध्ये असतं सगळं म्हणा!

पण वेगळ्या परिस्थितीतली वेगळी कारणं आणि त्यावरून होत असलेलं बोलणं मात्र सर्वस्वी त्या व्यक्तींमधलंच असतं असं नाही. खूप कमी वेळेला असं होतं. अथवा दोघांच्या बोलण्यात तिसऱ्या बद्दलच सुरु असतं. तो असाच आहे, ठीक वागणं मला पटत नाही वगैरे वगैरे. जसं कि कामाच्या ठिकाणी आपल्या मागून कुसूर फुसूर सुरु असते. किंवा मग आपलेच आवडते आणि चांगले मित्र-मैत्रिणी आपल्याच बद्दल वायफळ बोलत असतात.

कारणं असतील प्रत्येकाची प्रत्येकाकडे आता ती कोण समजून घेणार आणि कोणी समजावी हा तर प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आला. पण तो इथे कसा आला असा प्रश्न नको यायला कारण अहो, हाच तर टॉपिक होता आजचा आपला. बोलायला कशाला निमित्त हवंय आपल्याला एखाद्या छोट्याशा स्माईल ने पण बोलणीला सुरुवात होते तर मनातले भाव दिवस पुरणार नाहीत इतकं काही सांगतील.

वाचा फुटली विषयाला की त्याचा शेवट त्या व्यक्तींवरच अवलंबून असतो. म्हणजे “चल आपण भेटू नंतर खूप आहे बोलायला पण आता वेळ कमी पडतेय. पुन्हा कधीतरी भेटून निवांत बोलू पक्का.” हे वाक्य तर असतंच असतं. यार आजचा वेळ गप्पांमध्ये कधी गेला कळलंच नाही. आता नेक्स्ट टाईम भेटू. बोलणं हे कधीच न संपणारा टॉपिक आहे, तर हेच बोलणं अबोल्याला टॉपिक बनवणारं साधन आहे.

@UgtWorld



Related Posts