रक्षाबंधन, ट्रेंड आणि काही खरे-खोटे सण!
काही नवीन नसावं हे ऐकणं कि आजकालच्या सणांमध्ये भावना राहिल्या नाहीत. एखादा ट्रेंड येतो नवीन तसं काहीसं झालंय त्या सगळ्यांचं. साजरा करायचा म्हणून करायचा, ना कोणतं महत्व ना कोणता आदर. अगदीच टोकाकडे नको जायला पण काही जण करतात मनापासून साजरे आपले सण. तर काही फक्त दिखावा आणि समाजाला दाखवायला कि आम्ही सुद्धा या ट्रेंड मध्ये आहोत.
रक्षाबंधनच्या दिवशी भाऊ आपल्या बहिणीसाठी तरसतात आणि बहिणी आपल्या भावासाठी जे एकमेकांच्या जवळ नसतात. ते या साठी तरसतात कि त्यांना भेटता येत नसतं, काही जणांना बहीण किंवा भाऊ नसतो. काहींना घरच्या दबावामुळे नाही साजरा करता येत तर काही ठिकणी वादामुळे जुळवाजुळव होत नाही. काही जणांना तर काडी मात्र रस नसतो. ना तर त्यांच्या स्वतःच्या रक्ताच्या नात्याशी आणि राखीच्या असलेल्या नात्याशी. पण त्या पलीकडेही काही नाती आहेत जी रक्ताच्या नात्यापलीकडे असतात.
राखी काही ठिकाणी मस्करी म्हणून बांधतात. ‘मस्करी’ हो हो मस्करीच. कारण त्यांना त्यांचं वेगळं नातं लपवायचं असतं. आणि या पवित्र नात्याला काळिमा फासून मोकळे होतात. म्हणजे जगासाठी वेगळे आपापसात वेगळे. मला मान्य आहे प्रत्येकाच वैयक्तिक आयुष्य असतं पण ते जगासमोर तरी खुलेआम नका करू. जेणेकरून तुम्हाला कोणी नाव ठेवेल किंवा तुमच्या कृत्यावरून स्वतःला लाज वाटेल.
भाऊ-बहीण असण्याचा आनंद वेगळा असतो मग ते रक्तातलं असुदे अथवा मैत्रीतलं. त्याची तुलना नसतेच. पण ज्यांना त्यातलं काहीच नसतं त्यांच्या वाटेला जरासं का असेना दुःख वावरत असतं. ते क्षणिक असेललं च बर आहे. कारण आयुष्यात कोणी ना कोणी आपल्यासाठी भेटतं हे मात्र नक्की. आयुष्यात कोणत्या ना कोणत्या वाट्याला एक नातं जवळ लागतंच. आपण मान्य करू या नाकारू! पण हेच सत्य आहे.