आपल्या भावनांशी जरासं वास्तविक असलं पाहिजे…

सतत भावनिक नको, थोडं वास्तविक हवं!

आपल्या भावनांशी जरासं वास्तविक असलं पाहिजे…

आपल्या भावनांशी वास्तविक असलं पाहिजे. तुम्हाला या दबावाखाली आणायला कोणाला संधी देऊ नका , मग ती व्यक्ती तुमच्या जवळची असो किंवा इतर कोणी. सर्वात आधी नेहमीच स्वतःशी प्रेमाने वागायला हवं. तुमच्या भावनांना आदर देत चला, स्वतःला सुद्धा.

जर कोणी तुमच्या भावना ऐकल्या नाही किंवा त्या समजून घेतल्या नाही तर जास्त विचार करू नका. लोकं तसाही तुमच्याबाबतीत तुलनात्मक च विचार करणार आणि त्यांना तुम्ही नुकतेच भेटलात असं दर्शवून देणार. अशा प्रकारे विचार करा जिथे तुम्हाला कोणाचीच फिकर नाही. त्याऐवजी तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या. हा आत्मविश्वास या क्षणाला गरजेचा आहे. आणि त्या नंतर बदल दिसून येईन अलगद का असेना, संरक्षणाच्या मजबूत भिंती मनाभोवती तयार होत जातील.

तुमच्या भावनांचं रक्षण त्या भिंती नक्कीच करतील आणि ज्या भावना महत्वाच्या आहेत त्यांना सांभाळतील. त्या नाही ठेवणार जवळ ज्या गरजेच्या नाहीत. आजकालच्या दिवसात असे अँटीव्हायरस हवेत. जिथे भावनांशी खेळलं जाणार नाही त्याउलट त्यांना कळेल चूक बरोबर.

जे लोक आपल्यासोबत वाइट करतात. त्यांना काही वाटत नाही या बद्दल, कोणालाच फरक पडत नाही आणि का पडेल? आपणच हक्क देतो एखाद्याला आपल्या ताकतीचा आणि आपल्या गुपित गोष्टींचा उलगडा करून. जिथे आपण आपल्या पेक्षा दुसर्यांचा विचार जास्त करतो तिथेच आपण स्वतःचा स्वाभिमान एक पातळी खाली नेतो. आपण आपल्या चांगुलपणाला थोडा आळा घातला पाहिजे. सगळेच आपला चांगुलपणाच्या लायकीचे नाहीत.

पण ठीक आहे, भावनेच्या ओघात येऊन आपल्याकडून होतात चुका. कोणत्याही परिस्थितीतून बाहेर कधीही येता येतं. फक्त तुमच्या भावनांना, आत्मविश्वासाला थोडासा वेळ द्या. पुन्हा आपल्या कामाची, आपल्या ध्येयाची आखणी करा. ह्या भावनिक खेळापासून स्वतःला मुक्त करून टाका.

@UgtWorld

Related Posts