आवड प्रत्येकाची वेगळी वेगळी!

आवड सवयीच्या नेहमी जवळ असते…

आवड प्रत्येकाची वेगळी वेगळी!

आवड प्रत्येकाची वेगळी वेगळी! आपल्याला जर एखादी व्यक्ती आवडत असेल तर आपण हजार प्रकार शोधतो त्या व्यक्तीला आपल्याजवळ म्हणजेच आपल्या आयुष्यात आणण्याचा. जिवाच्या आकांताने प्रयत्न करतो तिला कसं खुश ठेवता येईल आणि एक ही संधी अशी सोडत नाही ज्यात त्या व्यक्तीच्या आयुष्यात आपला सहभाग नसेल. म्हणजे बारीक बारीक गोष्टींमध्ये नाव उच्चरणं, सतत काही हवंय का याची पडताळणी करणं. ह्या पेक्षा जास्त अजून काय हवं एखाद्याला.

आवड काही क्षण राहते असं म्हणतात, पण खरंतर काही आवडी या जन्मोजन्मी कायम राहतात. यामागचं कारण म्हणजे सवयीच्या भावना. मनाला लागणारी त्यांची गरज आणि जिथे गरज येते तिथे मग आपोआपच इच्छा जाते. कारण हवं असणं आणि गरज असणं यात किंचित असा फरक असतो, तो म्हणजे वस्तुस्थिती.

आपल्या मनातील वास्तव ठरवतं आपल्या या मनाला नक्की काय हवं नि नेमकी कसली गरज आहे. विषयात गुंतण म्हणजे अटी त्रुटी सगळं पाहावं लागतं तेच हे. जर आपल्याला कोणी आवडत असेल तर सरळ बोलून मोकळं व्हायचं असं काही म्हणतात. जर उशीर केला तर मात्र हातातून संधी जाऊ शकते, पण प्रत्येक वेळेला हे काम करेलच असं नाही. पण तर हे बहुतांश वेळेला काम करतं. म्हणजे मनात त्या व्यक्तीबद्दल विचार सुरू होतात.

मग पुढचा विचारविनिमय करून कोणत्यातरी एका विषयावर निष्कर्ष येतो तो म्हणजे हो किंवा नाही. काही वेळेला होकार असतो तर कधी नकार असतो, पण ह्यातून एक गोष्ट निष्पन्न होते ती म्हणजे तुम्ही मनात पश्चाताप न ठेवता स्वतःच मन मोकळं केलेलं आहे. ज्याने किमान तुम्हाला कोणत्या गोष्टीच वाईट वाटणार नाही. जसं मी विचारायला हवं होतं यार, वैगरे वैगरे. नकार जरी आला तरी नाकारला त्या होकारात बदलायला जास्त वेळ लागत नाही.

जिथे आवड असते तिथे आशा असतेच आणि या दोघांवर सवयीचं बारीक लक्ष असतं..

@UgtWorld



Related Posts