आयुष्य ठरवता येत नाही, पण चारोळ्या लिहून त्यांचं अनुमान लावता येतं…

आयुष्य चारोळ्या! आयुष्य हे अनुभवावर चालतं बरेच जण सांगतात. आपले घडलेले क्षण आपल्या जवळ ठेवून आपण पुढे सरत असतो. झालेल्या गोष्टींमध्ये खार खोत शोधत असतो.

ह्या चारोळ्यांमध्ये अनेक अनुभव दिसून येतील. अनेक गोष्टींनी दिलेले जखम आणि त्यावर लावले गेलेले मलम पण या शब्दांमध्ये जाणवतील. आयुष्यात प्रेम असतं, मैत्री असते आणि त्या सगळ्या भावनिक गोष्टी असतातच आणि त्यांची सवंगडी म्हणून ह्या चारोळ्या.

ह्या चारोळ्यांमध्ये अनुभव, भावना ज्या आपल्या सर्वाना एकसमान च वाटतील. त्या जवळच्या वाटतील. आणि वाचून आपलंच आयुष्य वाचल्यासारखं वाटेल. ह्या चारोळ्या फोटो आणि मजकूर दोन्ही फॉरमॅट मध्ये उपलब्ध आहेत.


आयुष्य चारोळ्या

कदाचित पुढे मागे

असावं काहीतरी घडीत

मगरूर असणाऱ्या शब्दांमध्ये

त्यातल्या शाब्दिक ज्वालांमध्ये…

आयुष्य चारोळ्या

माझी जागा एका ठिकाणी नव्हती कधी,

ती तिथेच होती जिथे तिचं असणं होतं

मी फिरलो म्हणा जगभर असाच

माझं फिरणं हेच आयुष्याचं जगणं होतं…

आयुष्य चारोळ्या

मनाजोगतं माणूस भेटायला

नशिबाने मेहेरबानी करावी लागते,

ज्यांना भेटतो तो माणूस!

त्यांनाच त्याची कदर नसते…

@UgtWorld




Write with us✍?

Greetings for Everyone from TeamUgtWorld! Anybody who wants to write whatever his/her Heart wants to. They can now publish their content with us at our platform @Ugtworld. For more information click on the following link…

Related Posts