आयुष्य चारोळ्या

सगळीकडे उठाठेव नको त्याची

गरज म्हणून काही उरलच नाही

वाटा मोकळ्या, मोकळी सारी बंधने

फिरे दाही दिशात मन हे वेडे…

आयुष्य चारोळ्या

मनाची घालमेल

अगणित उत्तरांची नजरफेर

कठीण वाटे जे काही

सर्वत्र पसरलेले तेच दिसे समोर…

आयुष्य चारोळ्या

सहज एकांत मिळावा मला

सुचावं प्रत्यक्षापलीकडलं

सर्वांनी समजावं असं

मी दर वेळी का लिहावं…

आयुष्य चारोळ्या

मी करेन काही असं

ज्याला अपवाद नसेल काही

मी माझ्याचसाठी असेन पुरेसा

मी नसेन दुसरा कुठेही…

आयुष्य चारोळ्या

मनातून उतरलोय कित्येक जणांच्या

पण हा त्यांचा व्ययक्तिक निर्णय

माझा त्या गोष्टीशी संबंध नाही

हा माझा व्ययक्तिक निर्णय…

@UgtWorld




Write with us✍?

Greetings for Everyone from TeamUgtWorld! Anybody who wants to write whatever his/her Heart wants to. They can now publish their content with us at our platform @Ugtworld. For more information click on the following link…

Related Posts