आयुष्य चारोळ्या

फक्त फायदा जमला

विचारपूस कधी जमलीच नाही म्हणा!

काळजी तरी कशाला अचानक?

अपेक्षा तर अजिबातच नाही म्हणा!

आयुष्य चारोळ्या

म्हणायला सारं काही

प्रत्यक्षात मात्र काहीच नाही,

जमाखर्च हा आठवणींचा

कल्पनांना सध्या थारा नाही…

आयुष्य चारोळ्या

एका अर्थाने नाही

समजत ना तुला नकार

का उगाच धरून बसलोय

जुन्या गोष्टी आणि तेच विचार…

आयुष्य चारोळ्या

अपरोक्ष माझ्या मीच का?

साक्ष देऊ माझ्याच-विरुद्ध

काही नियम मी ही ठेवलेत

स्वतःसाठी राखून सगळ्यां-विरुद्ध…

आयुष्य चारोळ्या

कळत नकळत का असेना

फार पुढे आलोय मी,

इथून माघार म्हणजे

आयुष्याची शून्यात गिणती नक्की…

@UgtWorld




Write with us✍?

Greetings for Everyone from TeamUgtWorld! Anybody who wants to write whatever his/her Heart wants to. They can now publish their content with us at our platform @Ugtworld. For more information click on the following link…

Related Posts