
श्वास कोंडतो माझा दरवेळी,
वाटा मिळत नाहीत तेव्हा,
अपेक्षा नसतात फार काही,
पण दिलासा मात्र शोधत असतो मौका…

साध्या मनाची खंत तर सहज जाणवते,
त्याला ओळखण्यात मात्र वेळ सरते,
त्या दरम्यान असलेल्या शांततेत
फक्त तिरस्काराची जाणीव होते…

समजत नाही जेव्हा काही,
शांत बसून उपयोग होत नाही,
शोधायचं त्या गोष्टीला थोडं इकडे तिकडे,
आपल्या मनातच असतं सगळं,
दूसरं कुठे ही ते जाणार नाही…

धुंद त्या नभाशी एक तपकिर,
सुगंध त्याला नितांत बेधुंदी,
मनकवडा हा मोह माझा,
जगणं हे बेभान अन् मनमौजी…

वेळ सरण्यासाठीच असते,
त्याला पर्याय कोणताच नाही,
आपणच जपून राहायचं तिच्यापासून,
तिचा हात धरणं शक्य नाही…