आतुर असलेल्या या शब्दांना
कसं बरं सांगायचं,
धावत्या मनाच्या चंचलतेला
कसं बरं आवरायचं….
थोडा धीर धर
ही सुरुवात करतो आहे,
शब्द एकदा भेटुदे
नवी लिखाणाची चाल करतो आहे…
शब्द येऊन त्याची रचना नाही करता येत
भावना असायला हव्यात त्यासाठी,नुसता खाऊन पोट भरता नाय येत
भूक असावी लागते त्यासाठी….
एक अशी कला जी फक्त कुणा एका मुळे मिळते
एक अशी कला जी कुणा एकामुळे जागृत होते,एक अशी कला जी सहज प्रेमात पाडू शकते
एक अशी कला जे सारं जग बदलू शकते….
पाहून ना दिसावे असं काही
कळून ना कळावे असं काही,
पुस्तक असं आहे वाचून समजेल पण
काही आहेत जी वाचल्याशिवाय करमनार नाही….