विसरण्याची सवय खूप उपयोगाची असते
काही आठवो न आठवो दुःख विसरायला होतं,
जास्तीस जास्त खुश राहता येतं
आणि सगळं मनातलं हलकं करता येतं…
मैत्रीतलं प्रेम थोडसं वेगळं असणार
त्यात प्रेमातली मैत्री निराळी असणार,
हे कोडं असं सोडवायला मजा येणार
आणि उत्तर असेल तर जगायला मजा येणार..
खूप वाटते ना काही तरी करायला हवं
पण नाईलाज असतो काही करता येत नाही,
पण येईल वेळ अशी पुढे ना कि
वेळेला सुद्धा आपल्या पुढे काही करता
येणार नाही…
हे असं सांगणं माझं
गुपचुप ऐकलं त्यांनी,
आता बोलायची अट आहे
काहीतरी नक्कीच ठरवलं त्यांनी….
सुरुवात करू लवकरचं नव्या विषयाला
विषय नवा असला तरी अभ्यास
जुनाच त्यातला,
शिकताना खूप मजा येणार आहे बघ
लिहायला तर छानचं गोष्ट सापडली मला….