अनपेक्षित मैत्रीचा स्पर्श!

आयुष्यात असणारा अनपेक्षित खजाना…

अनपेक्षित मैत्रीचा स्पर्श!

जेव्हा एखाद्या नावडत्या गोष्टीत आपण गुंतलेलो असतो तेव्हा वेळ अगदी हळू हळू सरते. पण जर ह्याच्या उलट आपण केलं म्हणजे आवडत्या गोष्टीत गुंतलो असू तर वेळ अशी धावते जणू तिलाच कुठेतरी घाईत पोहचायचं असतं. जिथे तिचं काहीही काम नसतं. हे असंच काहीसं होत आपल्याबाबतीत जेव्हा अनपेक्षित मैत्रीचा स्पर्श होतो.

स्पर्श का म्हणतोय असं विचार मनात येतोच, कारण जे क्षण आपण एकमेकांना देत असतो ज्या भावनेने त्या वेगळ्याच असतात. पहिल्यांदा त्या थोड्या अवघड जातात स्पष्ट व्हायला, पण नंतर त्या थेट हृदयाला भिडतात. वेळ सरते, आपण नात्यात पुढे जातो तसं हे आपल्या अंतर्मनाला अधिक भिडत जातं. पुढे ती मैत्री परिवार होऊन जाते.

जर का आठवलं आपले शाळेतले, कॉलेजचे दिवस किंवा आपल्या जॉब चा पहिला दिवस. आपण सर्वजण कोणा एका व्यक्तीला अनपेक्षित पणे भेटतो. कधी कधी अचानक भेटलेल्या व्यक्ती सुद्धा आयुष्याचा प्रमुख भाग बनून जातात. ज्यांना आपण आपल्या आयुष्यातला खजाना म्हणतो कारण ते तितके खास असतात.

हळू हळू आपण मान्य करू लागतो कि आयुष्याचा लहान मोठा भाग आपण ह्या मैत्रीत वाटला आहे. हो त्या व्यक्तीचं असणारं नातं देखील कारणीभूत असतं ह्या गोष्टीला. त्यात सुद्धा त्या व्यक्तीसोबत कितपत मोकळेपणानं राहता येत हे ही असतंच म्हणा! आपल्या आवडीच्या आणि मस्तीखोर मित्रमैत्रिणीं बरोबर आपल्याला क्षण रंगवायला आवडतं.

मान्य करा किंवा नको जरी ते नातं जास्त काळ राहो अथवा कमी. आपण आधीच आपल्या आवडीचे आणि सुंदर क्षण निवडलेले असतात. जर का तुम्ही ह्या स्पर्शापासून लांब असाल तर लवकरच असा स्पर्श तुम्हाला देखील होईल. कोणी एक मित्र किंवा मैत्रीण नक्कीच आपल्या आयुष्यात असतात जे आपल्या अंतर्मनाला हा स्पर्श करतात. माहित नसेल तर शोध घ्या! नक्कीच जवळ असणार ती व्यक्ती.

@UgtWorld

Related Posts