अंगण, रात्र आणि ते चांदणं!

अगणित गोष्टी मनात असलेली रात्र …

अंगण, रात्र आणि ते चांदणं!

ती रात्र रातकिड्यांची किरकिर, काजव्यांनी भरलेलं अख्ख झाड स्वतःचा वेगळा प्रकाश घेऊन निवांत होती. वर नजर फिरवावी तर लक्ख घनदाट चांदणं पडलं होतं. त्याचा ही वेगळाच असा उजेड नवखा एकदम. नजर हटतच नव्हती त्या दोन्ही गोष्टीतून आणि मग विचार पडायचा नक्की कुठे पाहू, काजवे की चांदणे.

मन भरतच नव्हतं इतका वेळ पाहून सुद्धा. त्या चांदण्यांमध्ये सप्तर्षी शोधत होतो आधी! आता ती स्पष्ट उमटून आली होती. तिची नक्षी किती सुंदर दिसते या दाट चांदण्यात! ज्यांनी पाहिलं असेल तेच सांगू शकतात या बद्दल. कारण शब्द थोडंसं वर्णन करवू शकतात, भास देऊ शकतात पण ते अनुभवायची एक वेगळीच नशा असते. जी लवकर उतरत नाही निदान त्या क्षणी तरी.

रस्त्यावर बसून किंवा रानात जाऊन ते पाहणं ह्याला काही तोडच नाही. घराकडे पाऊलवाट फिरवताच लागणारा हलकासा गारवा आणि पुढ्यात असलेल्या शेकोटीची ऊब सोबत घेऊन निघताना जी उदासी येते ती शब्दांपलीकडची असते.

ती उदासी येते अन तो क्षण सोडावा लागतो. येऊन अंगणात झोपायचं गरम गरम गोधडी नी पुन्हा डोळे त्या आभाळाकडे. पण यावेळी दृश्य वेगळं असतं. चांदणं तेच असतं पण त्याला बघण्याची मजा वेगळी असते. सप्तर्षी पण कुठल्या तरी झाडाच्या आडोश्याला लपलेली असते. हळू हळू ते डोळे थकून आपल्या पापण्यांची चादर घेतात. आणि त्या निरागस रात्रीच्या चित्रात हरवून जातात.

@UgtWorld




Write with us✍?

Greetings for Everyone from TeamUgtWorld! Anybody who wants to write whatever his/her Heart wants to. They can now publish their content with us at our platform @Ugtworld. For more information click on the following link…

Related Posts