बेचैन मन आणि बेचैन भावना…

बेचैन विचारांना सापडलेला गोंधळ!

बेचैन मन आणि बेचैन भावना…

“बेचैन मन सारखं होत आहे आता. मदतीचा हाथ मिळावा ही माफक अपेक्षा, स्वतःकडून मिळाला तर जास्त छान वाटेल, कोणाकडून मदत घेणं भावनिक उपकारात भर पाडेल…” मन बेचैन झालंय, एकटंस पडलंय आणि त्याचबरोबर कुणाशी बोलायचं की नाही याचा प्रश्न वेगळा पडतो मनाला.

सतत अगदी ३ वेळा सतत यावं असंच. मनात विचारांची गर्दी सुरु होते, तिला कमी करायला मार्ग मिळत नाही. त्याउलट अधिक मार्ग तयार होतात गर्दी कशी वाढवावी यासाठी. पण एक गोष्ट मनाने विसरलेली असते. जेव्हा आपल्या भावनांच्या तिजोरीची चावी हरवते त्या क्षणी आपल्याकडे आणखी एक चावी असतेच. पण ती कुठे आहे किंवा कुठे ठेवली आहे याचं भान राहत नाही. ते भान जरा बाजूला ठेवून आपण जराशी मेहनत घेतली. तर आपण ती तिजोरी उघडून त्यातल्या त्रासक भावना काढून टाकू शकतो. आणि त्या रिकाम्या जागेत गरजेच्या चांगल्या भावना पुन्हा साठवू शकतो.

त्रासलेले मन नेहमी चुकीच्या वाटेवर घेऊन जातं. अबोला धरणं मग ते स्वतःशी असेल किंवा मग त्या कुणा जवळच्या व्यक्तींशी ज्यांची निवड आपणच केलेली असते. आपल्या मनाला मोकळीक देण्यासाठी. पण प्रत्येक वेळी असं होत नाही त्यामुळे अजून त्रास होतो. परंतू त्या त्रासापलीकडे एक व्यक्ती अशी असतेच जी नकळत आपल्याला निरखत असते. आपल्या रोजच्या बोलण्यातल्या सवयीतून किंवा मग झालेल्या बारीक बदलावातून ते जाणवतं. अगदी सहजपणे ते कळून येतं. आपल्यावर कोणाच्याही व्यर्थ किंवा वायफळ बोलण्याचा ताण नाही पडू द्यायचा. एकांत प्रत्येकाला झेपत नाही. तो झेपेल की नाही याच उत्तर आपलं आयुष्यच देतं आणि ते स्वीकारण्याची ताकद सुद्धा.

“सांभाळावं माझ्या मनाने मला, हद्द संपली सहनशक्तीची यंदा, अनेक दरवाजे उघडकीस आलेत पुढ्यात, जावं की नको ही परिस्थिती आहे सध्या…” कधी-कधी निवडक गोष्टी खूप जास्त त्रासदायक असतात. ज्याचं आपल्या जवळ असणचं मुळात घातक असतं. पण कोण जाणे का? आपण त्या सोडत नाही. हे जाणून देखील की, याचा आपल्याला सगळयात जास्त मनस्ताप होतो. कधी कधी वेळ येतेच अशी की, आपल्याला त्या गोष्टीतून, व्यक्तीतून निघायला वाट मिळत नाही.

काय माहिती कसं पण ते जमत नाही. मुळात ते शक्य होत नाही असं वाटतं. यावेळी अश्रू येणं, मन उदास होणं स्वाभाविक आहे. रडणं ही नैसर्गिक गोष्ट असली तरी सर्वांवर त्याचा उपयोग होतो असं नाही, तसं नसतंच मुळात क्षणिक ठीक आहे त्या वेळेपुरतं. पण त्या रडण्याने झालेल्या गोष्टी बदलता येत नाहीत. रिकाम्या वेळेत आलेले विचार शिकवणीचे किंवा त्रासदायक का असतील नेहमी त्यात नव्या प्रेरणांच अंकुर फुटू शकतं. आपल्या मनाच्या भावनिक स्पर्शाला अलगद प्रेमळ स्पर्श मिळू शकतो. आणि तो मिळेल एकदा बोलून पहा, त्याला स्पर्शून पहा अर्थात जगून तर पहा.

@UgtWorld



Related Posts

2 thoughts on “बेचैन मन आणि बेचैन भावना…

Comments are closed.