भास, भ्रमात की कल्पना नेमकं काय?

इतका खरा भास तरी कसा?

भास, भ्रमात की कल्पना नेमकं काय?
भास, भ्रमात की कल्पना नेमकं काय?

संध्याकाळी घरी आल्यावर जेव्हा कळतं आज तुम्ही एकटे आहात. आणि जेव्हा सगळं तुम्हाला करावं लागणार असतं, अगदी चहापासून ते जेवणापर्यंत. कधी कधी असा भास होतो की आपण सगळं करून ठेवलेलं आहे, आता फक्त जायचं आणि खायचं पण असं वास्तवात काही नसतं, तो फक्त आपला भ्रम असतो. तेव्हा मात्र कंटाळ्याची चादर येते अंगावर. मनोज घरी आला होता. बाईक बिल्डिंग खाली पार्क करून तो जिने चढत होता. चार मजली बिल्डिंग मध्ये शेवटच्या मजल्यावर राहणं कधी-कधी त्याला वैतागून सोडायचं.

तो दरवाजा खोलून आत येतो, लाईट गेलेली कळताच रागात तोंडातल्या तोंडात पुटपुटतो. आधीच घामाघूम झालेला त्यात घरात लाईट नाही. राग येणं स्वाभाविक आहे. तो बाथरूम कडे वळतो आणि अचानक पंखा सुरु होतो. तो दचकतो आणि मागे वळतो तर कळतं लाईट आली. तो फ्रेश वगैरे होऊन पुन्हा बाहेर येतो. चहा करण्यासाठी किचन मध्ये जातो तर फ्रीज वायब्रेट होत असतो. हा फ्रीजचा दरवाजा उघडतो तर फ्रीज मधली लाईट ये-जा करत असते. लाईट पुन्हा जाते. “काय फालतुगिरी लावली आहे या लाईट ने”

तो गॅस पेटवतो, चहाचं पातेलं ठेवतो. मागे वळायला जाणार त्यात त्याला असं वाटतं, कि कोणीतरी आपल्या मागे आहे. कारण त्याला त्या श्वासांचा आवाज ऐकू येत असतात. पण त्या श्वासांचा आवाज आता अधिक वेगाने येत होता. त्याचसोबत हलक्या हलक्या धापा लागल्याचा सुद्धा आवाज कानी पडत होता. मग तो मागे वळून बघतो तर समोर बाथरूमचा दरवाजा उघडून कोणीतरी आत गेल्याच दिसतं. दरवाजा बंद होतो आणि नळातून पाणी यायला सुरु होतं.

भास, भ्रमात की कल्पना नेमकं काय?

तो दुर्लक्ष करून एक कप काढतो आणि चहा ओततो. कप उचलून हॉल मध्ये येऊन बसतो. पाण्याचा आवाज बंद होतो, बाथरूमच्या लॅचचा पण आवाज येतो. मधेच पुन्हा पंखा सुरु होतो, लाईट येते. तो हॉल मध्ये येतो आणि टीव्ही लावतो. टीव्ही वर गाणी सुरु असतात. त्या चहाचा कप तिथे बाजूच्या स्लायडिंग वर ठेवतो आणि तिथेच त्या बेडवर तो झोपून जातो. डोळा लागेलच असं वाटताच, अर्ध्या झोपेत असतानाच अचानक एक आवाज होतो जसं काय कुकरच उडाला. तो दचकून उठतो आणि सरळ आत जाऊन बघतो तर सगळं नॉर्मल असतं.

तो हॉल मध्ये येतो आणि त्याच्या पुढ्यातच तो तुटलेला कप दिसतो. “अच्छा तर याचा आवाज होता. पण मग इतका जोरात कसं” तो त्याचा फोन काढतो आणि कॉल करायला जाणार तितक्यात तो मेसेजेस बघतो. आकांशाचा मेसेज आलेला असतो. “दादा मी गावी पोहचली, जेवण वेळेत खा दोन दिवसात येईन मी.” तो मेसेज वाचून तो काही क्षण भारावून जातो. ही गावी गेली आहे, हे मी कसं विसरलो आणि जर का ही गावी आहे मग त्या बाथरूम मध्ये कोण होतं? कोण आलेलं माझ्या मागे मगाशी ?

@UgtWorld

Related Posts