भीती – विचारांत गुंतलेली!

भीती पोटी राहिलेली अर्धवट पाऊलवाट…

भीती - विचारांत गुंतलेली!

नेमकी कसली आहे भीती याचा अंदाजच येत नाही आहे. तिचा हा येणारा होकार याची की, तिने विचारल्यानंतर तुझ्या तोंडून निघणारा नकार. नेमकं काय? याचा ताळमेळ तरी कसा लागणार आहे. काही ठाव लागत नाही. काय करावं आताच्या घडीला काहीही कळत नाही.

सरळ सांगून मोकळं व्हावं! जर का ते मनात असेल तर बोलून मोकळी हो. नसेल काही तसं तर मनातून काढून टाक एकदाचं. उगाच जीवाला टांगणीवर ठेवू नकोस. काही उपयोग होणार नाही. त्या गोष्टीचा उगाच त्रास मनात बाळगून काही फायदाच नाही. ही गोष्ट समजून घे आणि मग पुढचे निर्णय घे. मान्य आहे भीती असते मनात. इतकं सोपं नसतं पण वाटतं तितकं अवघडही नसतं.

जरासा तरी त्रास सहन करणं भाग असतं. आणि तितका त्रास त्या क्षणाला जमला तरी देखील भरपूर आहे. कारण मनातलं बरच काही निघून जाईल, आणि ते नक्कीच बोलायला सोपं करून देईल. प्रयत्न करून बघ आता टाक बोलून मनातलं सरळ-सरळ. आणि मला खात्री आहे हवं तसंच होईल. मनातली जी भीती आहे ती जाईल निघून अगदी सहज. जिंक मग आता मन स्वतःच.

@UgtWorld




Write with us✍?

Greetings for Everyone from TeamUgtWorld! Anybody who wants to write whatever his/her Heart wants to. They can now publish their content with us at our platform @Ugtworld. For more information click on the following link…

Related Posts