पहाट होती जागी त्या चारोळ्या मधील शब्दांत

पहाट चारोळ्या, पहिला प्रहर सरला कि पहाटेकडे लक्ष जातं. ज्या ज्या गोष्टी आपण रात्रीत ठरवल्या असतात त्यांना धक्का दद्यायचं बळ पहाट देत असते. त्याच बरोबर सुस्ती ही किती महत्वाची असते याचं बालिश उदाहरण देत असते.

या चारोळ्यांमध्ये सुस्तीतली मस्ती, प्रेमातली तारीफ आणि बरंच असं काही. एक उत्स्फूर्ती मिळते शब्दांना, अर्धवट राहिलेल्या स्वप्नांना लिखाणात आणायला चारोळ्या होतातच. त्यात ही असतात ठसे आपल्या मनाच्या कोपऱ्यातले.

पहाट चारोळ्यांमध्ये बऱ्याच गोष्टी उलगडतील. थोडी मजा थोडी शाब्दिक सुस्ती जाणवेल. ह्या चारोळ्या वेळ मात्र चांगला घालवण्यास मदत करतील. ह्या चारोळ्या फोटो आणि मजकूर दोन्ही फॉरमॅट मध्ये उपलब्ध आहेत.


पहाट

किती वेळ अजून असं चालणार

थोड थोड करत किती लोळणार
बस कर आता तिला मोकळं कर जरा
त्या चादरीला किती मिठी मारणार

पहाट

डोळे उघडुन उठलो अंथरुणातून
जांभई दिली पोट भरून
सगळ धूसर दिसायला लागलं

चादर राहिली होती ना डोक्यावर अडकून

Related Posts