पहाट घेऊन यावी तू
अन् दिवस सुरू व्हावा तिथून
प्रत्येक क्षणाची जोड बनवी तू
अन् सहवास घडावा त्यातून
सकाळ ही तुझ्यासवे
ह्या दिवसाचे तास ही तुझ्यासवे
असे काहीच न उरावे निसर्गात
जे ना होईल तुझ्यासवे
ही सांज पूर्वीची सकाळ
स्पर्शिक धुक सोबतीला त्याचा सहवास
एक छोटीशी गोष्ट त्याचा साजतुझी चाहूल आणि तुझाच आवाज
पहाट बनत सूर्य आला
किरणे पसरवत तो अजून वर गेला
म्हणाला जरा उठा आता
तुमचा दिवस सुरू झाला
हा सूर्य नभातून बाहेर आला
तुला पाहण्यासाठी मी त्याला आरसा केला
आभाळ म्हणलं आम्हाला पण सांग काहीतरी
त्यांना म्हटल तुला माझ्या सोबत ठेवा