पहाट

ही सकाळ पाहायला अख्खी रात्र गेली
एक उजेड द्यायला काळोखाची बत्ती ओघळली
सूर्यकिरण जेव्हा पडले डोळ्यावर
तेव्हा डोळ्याची पापणी उघडली

पहाट

सकाळची पहिली भेट तुझी व्हावी
पहिला शब्द तुझा पडावा कानी
किती मस्त असेल ती भावना
सांगता येत नाही पण व्यक्त होईल ती

पहाट

पहाट नव्या किरणांची अशी घेऊन आली
जणू नवीन आणि जुन्या गोष्टीतला फरक सांगू लागली
त्यात हा गारवा शरीराचे शहारे उभे करू लागला
ह्या गुलाबी थंडीची वेळ आता आली

पहाट

शुभ्र सकाळ आणि त्यात साखरेचा घास
असा तुझ्या बोलण्यातला आभास
तुझी चाहूल तुझ असणं मुळात
प्रवृत्त करते या सगळ्यांना
बनवण्यास खास

पहाट

सूर्याच्या उजेडात पापण्या मिटल्या
तुझा आवाज ऐकताच त्या पटकन उठल्या
झोपेत असाव्यात त्या बहुधा
पण आता मात्र तुलाच शोधत होत्या

Related Posts