प्रेम सर्वत्र आहे, आणि प्रेमाच्या चारोळ्या देखील
प्रेम चारोळ्या… प्रेम आयुष्याचा मुख्य भाग असतो. प्रेम म्हटलं तर खूप छान अशी भावना वाटते. आणि हि भावना आपल्या कडून काहीही करून घेऊ शकते.
प्रेम आपलं सगळं आयुष्य बदलून टाकतं. आपला आत्मविश्वास वाढवतो बऱ्याच गोष्टीतून. आपल्या दुर्बलतेला तो आपली ताकद बनवतो.
प्रेम आयुष्यात काहीही करू शकतो. ह्या चारोळ्या तुम्हाला नक्कीच प्रेमळ अनुभव देतील. प्रेम करा! तुम्हाला त्यात छान आठवणी सापडायला वेळ लागणार नाही. ह्या चारोळ्या फोटो आणि मजकूर दोन्ही फॉरमॅट मध्ये उपलब्ध आहेत.
ही सांज सावली तुझ्यासाठी
ही रात्र धावली तुझ्यासाठी,
मी तर म्हणतो सगळा निसर्गच घे
हा जीव आणि हे हृदय पण तुझ्यासाठी…
असं कसं होईल तुला सुचणार नाही
मी ऐकल्याशिवाय सोडणार नाही
नकोच सोडू कधी असच राहूदे
कारण तुझ्याशिवाय लिखाण शक्यच नाही…