
तुझ्या गालावर एक पाखरु !
हास्य ज्याचे नाव गतू लालबुंद झाली या फुलासारखी
गुलाब त्या फुलाचं नाव ग…

तुझ गाणं झालय तयार
मन लागलय गुणगुणू,तू माझी प्रीत राणी
मी तुझा प्रेम ऋतू..

ते रोपटं झुरतं त्या बीजा साठी
वारा पाणी सोसतं काळजी पोटी,
माया दिसून येते जेव्हा काळजी उमलते त्यावर
बहर येतो फुलांचा फक्त प्रेमाखातर…

माझ्या एवढ्या जवळ येऊन
तुला दूर तर जावे लागणार नाही,
याचीच भीती नाही
तर काळजी वाटते मला….

तुझ्या पाऊलखुणा दिसल्या आता
जाता जाता उठवून गेल्या त्या,
पण झोप इतकी आली होती काय सांगू
तुझ्यासाठी अंगाई गीत गाऊन गेल्या त्या…