तू इतकी छान कविता होशील ह्याची खात्री होती

त्यातल्या भावना इतक्या मनमोहक होतील खात्री होती,

तुझ्यातलेच शब्द आणि तुझ्यातल्याच ओळी

तुझच आहे सगळे आणि हे आवडेल याची खात्री होती…

तूच तू हवी होतीस ना

अजूनही तूच हवी आहेस,

एक क्षण विचार केला होता

तुला मी हवा आहे कि नाही?

तुझ्या समवेत ही दुनिया होते छान

तुझ्या समवेतच ही होते सुंदर,

फक्त तुझ्या समवेतच हा! लक्षात घे

तुझ्या समवेतच पूर्ण होते जग सारे…

ती रेग आखली मी हातात माझ्या

जी वाट पाहिली मी डोळ्यात तुझ्या,

आता सोबतीला राह त्या मार्गावर

तो रस्ता गाठायचा आहे मदतीने तुझ्या….

शब्दांची रचना कशी सुचते

मला तर प्रेमात पडायला होतं,

इतकं प्रेम करणं कसं जमतं

मला तेच प्रेम करावसं वाटतं…

Related Posts