पाहण्याची ही अदा कशी काय जमते
मला तर हरवायलाच होतं त्यात,
डोळ्यात धुंदी कशी काय चढते
मला तर नशेत आल्यासारखं वाटतं…
वाट सरली अर्धी जाता जाता,
भेटली भली माणसं इकडे तिकडे पाहता,
खूप प्रेम मिळालं त्यांसकडून
आता निघालो पुन्हा तुला भेटण्याकरता..
बोलणं इतकं आकर्षित कसं असतं
मला त्याच्या मोहात पडायला होतं
सोबत इतकी जवळची वाटते ना
मला तसच सोबत राहावस वाटतं…
मैत्रीतलं प्रेम थोडसं वेगळं असणार
त्यात प्रेमातली मैत्री निराळी असणार,
हे कोडं असं सोडवायला मजा येणार
आणि उत्तर असेल तर जगायला मजा येणार…
तू वीज गगनातील अंगावर अशी आली
मनाच्या कानाकोफ्यात येऊन पडली,
प्रेमाचा वर्षाव केला, अगदी जवळ आली
अन हृदयात सर्वत्र प्रकाश करून गेली…