नशा कि अदा सांग बरं काय असेल
सोबत कि दुरावा सांग बरं काय असेल,
मैत्रीतलं प्रेम कि प्रेमातली मैत्री
हे कोड कि उत्तर सांग बरं काय असेल….
सगळ्यांसाठी सगळ असेल बाकीचं
काहींसाठी फक्त मीच आहे,
खूप जण मागे लागतात सोबतीसाठी
पण माझं करणं तर फक्त तुझ्यासाठी…
तुझ्यात मी अडकून बसलो
हसता खेळता आपण मस्ती करत बसलो,
तुही साथ भारी दिलीस मला
आणि आपण तेच करत गेलो…
ना नातं नेहमीसारखं
ना त्याची वाटचाल तशी,
तू म्हणजे एक वेगळंच जग आहे
तुझ्यातच वसवली मी दुनिया माझी…
असंही असेल वाटलं नव्हतं
प्रेमात पडता येईल वाटलं नव्हतं,पण झालं तसं सगळं जे होत नव्हतं
इतका आत होतो बाहेर पडता येत नव्हतं….