सुगंध बनून भास झाला तुझा
म्हटलं तूच आलीस जवळ असं वाटलं
काही वेळा,
पण नव्हतीस तू जवळ फक्त भास होता तो
पण पुढल्याच क्षणी तू मिठीत घेतलं मला….
तुझे गुलाबी गाल
त्यावर लाली लाल,
गुलाबालाही लाजवतील ते
अशी सुंदर कळी छान…
सगळेच असतील प्रेमात तुझ्या
त्यात काही नवल नसावं.
मी अशी व्यक्ती बनेन ना
जिच्या प्रेमात तू पडावं…
नकळत मन मनातच हसले
तुझे पाहणे आता आठवणीत आले,
किती गोड होते ते हावभाव तुझे
जेव्हा ते पुन्हा पाहण्यात आले…
तू हा ना मध्ये गुंतवलस
माझं मन थोडं वेडं झालं.
आता तूच घे सोडवून याला
जरा तूच दे शब्द मुक्या भावनांना…