खुश जेव्हा तू होतेस

एक छानशी भावना मनात येते,

एक वेगळाच आनंद असतो त्यात

ते करायला वेगळीच मजा येते…

ह्या फुलपाखरात तुझे रंग उतरलेत

सत्या हवेत ते सर्वत्र पसरले,

त्या मोहापायी सात्या पाकळ्या फुलल्या

आणि तुझ्यातच माझे मन हरवले…

तू तू आहेस तुझ्या जागी कोणी नाही

तू एक नदी जिच्या जोडीला सर्व काही.

तू खूप सुंदर अशी निसर्ग पाकळी

तू हृदयाची राणी आणि बरंच काही…

तू हो माझी एवढीच इच्छा आहे आता

तुझी सोबत हवीये हरवलेल्या मनाला.

सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेस तू

प्रेमाने तुझ्या या प्रश्नांना सोडव जरा…

तुझ्या डोळ्यात बुडालोय मी तू सावर मला

तुझ्या असण्यात हरवलोय मी सापड मला.

तुझ्या बोलण्यात गुंग आहे मी शोध मला

तुझ्या वर प्रेम करतो मी स्वीकार मला….

Related Posts