तुझ्या चेहयाचा गोडवा

साखरेचा पाक त्याला लाजला.

बस असच असुदे गोडव्याचं प्रमाण

खूप छान दिसतं ते तुला….

असं रुसू नको

तू रागावू नको,

थोडं हस तरी

ते मात्र थांबवू नको…

तू हसण्याची कळी फुलवतेस

एक जादू मनावर करतेस,

किती तरी पद्धती आहेत कुणाचा वापर करू

तुझी एक तारीफ संपली कि

पुन्हा करावी वाटते…

असं तसं नाही काही

साधं सुधं नाही काही.

अरे एकुलतं एक आहे नातं

त्याची कुठे तुलनाच नाही….

ही नदी वाहते वेगाने

मज नेती तुझ्या अशा वेधाने,

तू हो स्थिर काही क्षणी

मग जाऊ सैर करू या लाटेवर बसून…..

Related Posts