नाजूक नाजूक ओठांची

झलक तरी पाहू दे.

एकदा पुन्हा ते मधाळ

असं हास्य ओठांवर येऊ दे….

प्रेमात तर सगळेच पडतात

प्रेमाला जवळ कुठे घेतात

त्याचा वापर करतात फक्त

त्याला समजून कुठे घेतात….

ही प्रेमाची नशा असतेच अशी

धुंद मन करतेच ती

कसली ही फिकीर नाही ठेवत जवळ

फक्त खुश राहण्याचा मार्ग देते ती…

तुला कळून न चुकावं काही

याची दखल घेता येत नाही

पण तुला सारं कळवून टाकावं

हे सांगितल्या शिवाय राहता येत नाही….

खुलून आलं जग सगळं

त्या एका हसण्याच्या झलक मधून,

बहरून आलं मन असं

त्या सूंदर नजरेला पाहून…

Related Posts